Join us

PHOTO: कदमांचो गणपती! गणेशोत्सवासाठी छाया कदम पोहोचल्या कोकणात; दाखवली बाप्पाची झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 18:31 IST

1 / 7
सध्या जिकडे-तिकडे गणेशोत्सवामुळे भक्तीमय आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
2 / 7
अनेकजण गणेश चतुर्थीनिमित्त गावी गेले आहेत. शिवाय काही कलाकारांनी देखील यंदा गणेशोत्सवासाठी कोकणाची वाट धरली आहे.
3 / 7
अशातच मराठमोळी अभिनेत्री छाया कदम या देखीत त्यांच्या मुळगावी धामापूर येथे पोहोचल्या आहेत.
4 / 7
छाया कदम यांच्या कोकणातील घरात बाप्पा विराजमान झाले आहेत.
5 / 7
नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर गावकडील गणेशोत्सवाचे फोटो शेअर केले आहेत. ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
6 / 7
या फोटोंद्वारे त्यांनी गणपती बाप्पाची झलक देखील दाखवली आहे.
7 / 7
अभिनेत्रीच्या गावच्या घरातील सुंदर असं तुळशी वृंदावन प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतं.निसर्गाच्या कुशीत वसलेलं त्यांचं कौलारू घर खूपच खास आहे.
टॅग्स :गणेश चतुर्थीसेलिब्रिटीकोकणसोशल मीडिया