Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाहताच क्षणी प्रेमात पडले, एक फोन केला अन्...अशी सुरु झाली महेश मांजरेकर यांची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 11:56 IST

1 / 8
मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेलं नाव म्हणजे दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar). अभिनय असो, दिग्दर्शन असो किंवा बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर आपली छाप पाडतात. तर त्यांच्या जवळपास प्रत्येक प्रोजेक्टमध्ये त्यांची पत्नी मेधा मांजरेकर (Medha Manjrekar) या असतातच.
2 / 8
महेश आणि मेधा मांजरेकर यांची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. मेधा या महेश मांजरेकर यांच्या दुसऱ्या पत्नी.मेधा यांना पाहताच क्षणी ते त्यांच्या प्रेमात पडले होते आणि थेट आपल्या सिनेमात काम करण्याची ऑफरही दिली होती. नक्की कशी झाली दोघांची भेट बघुया.
3 / 8
तर या दोघांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली 1995 साली. तेव्हा महेश मांजरेकर 'आई' हा सिनेमा दिग्दर्शित करत होते. त्याचदरम्यान त्यांची भेट मेधा यांच्याशी झाली. बघताच क्षणी महेश मांजरेकर मेधा यांच्यावर भाळले.
4 / 8
इतकंच नाही तर त्यांना मेधा एक अभिनेत्री म्हणूनही उत्तम काम करेल असं त्यांना वाटलं. मेधा यांना आपल्या सिनेमात घेण्याची त्यांची इच्छा होती. अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्याकडून त्यांनी मेधाचा नंबर घेतला. मात्र मेधाचा सिनेसृष्टीशी काहीच संबंध नसल्याची माहिती नीना यांनी दिली.
5 / 8
तरीदेखील महेश मांजरेकर यांना तिलाच सिनेमात घ्यायची इच्छा होती. त्यांनी मेधा यांना फोन केला आणि चित्रपटाची ऑफर दिली. तेव्हा मेधा यांनी एका अटीवर काम करेन असं म्हटलं.
6 / 8
तेव्हा मेधा युरोप टूरवर निघाल्या होत्या.त्यामुळे युरोपमधून आल्यावरच शूटिंग करु शकेन असं त्या म्हणाल्या. महेश मांजरेकर यांनी ही अट मान्य केली आणि सिनेमाचं शूट पुढे ढकललं.
7 / 8
पुढे मेधा आणि महेश यांच्यात प्रेमही फुलू लागलं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांना सई ही मुलगी झाली. दोघांची जोडी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. मांजरेकर कुटुंबाचा मराठी सिनेसृष्टीत दबदबा आहे.
8 / 8
महेश मांजरेकर यांना पहिल्या पत्नीपासून सत्या आणि अश्वामि ही दोन मुले आहेत तर मेधा पासून सई ही मुलगी आहे. याशिवाय गौरी इंगावले ही त्यांची मानसकन्या आहे.
टॅग्स :महेश मांजरेकर मेधा मांजरेकरपरिवारदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टसई मांजरेकर