तीन फुल्या आणि तीन बदाम! 'लपंडाव' चित्रपटातील 'ही' अभिनेत्री आता कशी दिसते माहितीये का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 16:05 IST
1 / 9१९९३ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला लपंडाव हा चित्रपट आठवतो का? अशोक सराफ, विक्रम गोखले, सराफ, विक्रम गोखले, सविता प्रभुणे, वर्षा उसगांवकर, अजिंक्य देव, सुनील बर्वे अशी दिग्गज स्टारकास्ट या चित्रपटात झळकली होती.2 / 9उत्तम अभिनय आणि कथानकाच्या जोरावर या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याकाळी हा चित्रपट तुफान गाजला होता. 3 / 9या चित्रपटात अभिनेता सुनील बर्वेने असिमची भूमिका साकारली होती. तर त्याच्या बेस्टफ्रेंडची म्हणजेच मुग्धाची भूमिका अभिनेत्री पल्लवी रानडे-खारकरने वठवली होती.4 / 9'तीन फुल्या आणि तीन बदाम' या निनावी नावाने असिमला प्रेमपत्र पाठवणारी मुग्धा म्हणजेच पल्लवी रानडे त्याकाळी चांगलीच लोकप्रिय झाली होती.5 / 9या चित्रपटासाठी पल्लवीला राज्य चित्रपट महोत्सवात विशेष अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आलं होतं. परंतु, या चित्रपटानंतर ही अभिनेत्री कलाविश्वापासून दूर झाली. त्यामुळेच सध्या पल्लवी काय करते हा प्रश्न चाहत्यांना पडतो.6 / 9कलाविश्वापासून दूर झालेली पल्लवी आज यशस्वी वर्किंग वुमन आहे. इतकंच नाही तर ती विदेशात स्थायिक आहे.7 / 9पल्लवी अमेरिकेतील सॉल्ट लेकसिटी युटा येथे स्थायिक असून तिने कम्प्युटर सायन्स मधून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. आज जवळपास २० वर्षाहून अधिक काळापासून ती बायोमेडिकल इन्फॉर्मेटिक क्षेत्रात कार्यरत आहे. 8 / 9सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, प्रोजेक्ट लिडरशिप या क्षेत्राचाही तिला दांडगा अनुभव आहे. 9 / 9पल्लवीने संदीप खारकरसोबत लग्न केलं असून त्यांना दोन मुली आहेत. पल्लवीची लेक विस्मया खारकर हिला नृत्याची विशेष आवड आहे, परदेशात राहून तिने शास्त्रीय नृत्याचे धडे गिरवले आहेत.