Join us
Daily Top 2Weekly Top 5

अशोक सराफ यांच्या ‘वख्खा विख्खी वुख्खू'मधली प्रियतमा आठवतेय? एक अपघात अन् करिअर उद्ध्वस्त, झाली अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 11:46 IST

1 / 10
अशोक सराफ, महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे ९०च्या दशकातील गाजलेलं त्रिकुट. यांनी अनेक हिट सिनेमे दिले. त्यापैकीच एक म्हणजे 'धुमधडाका'.
2 / 10
'धुमधडाका' सिनेमातील अशोक सराफ यांचा ‘वख्खा विख्खी वुख्खू’ हा डॉयलॉग प्रचंड गाजला. या सिनेमात त्यांची अभिनेत्री सुरेखा उर्फ ऐश्वर्या राणे हिच्यासोबत जोडी जमली होती.
3 / 10
सुरेखा राणे यांनी या सिनेमात सीमा वाकडे ही भूमिका साकारली होती. अशोक सराफ यांची प्रियतमा तेव्हा खूप गाजली होती.
4 / 10
त्यांनी भटकभवानी या सिनेमातही मुख्य भूमिका साकारली होती. सुरेखा यांनी केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्येही काम केलं.
5 / 10
'शराबी', 'नमक हलाल' अशा हिंदी सिनेमातही त्या दिसल्या होत्या. अमिताभ बच्चन, निळू फुले, परवीन बाबी, जयश्री गडकर यांच्यासारख्या कलाकारांसह त्यांनी स्क्रीन शेअर केली.
6 / 10
मात्र एक अपघात आणि त्यांचं अख्खं करिअर उद्ध्वस्त झालं. मर्द या सिनेमात अमृता सिंगच्या बॉडी डबलचे काम असताना त्या घोड्यावरुन खाली पडल्या.
7 / 10
हा अपघात इतका जबरदस्त होता की त्यांच्या शरीराचं प्रचंड नुकसान झालं होतं. दुबईला त्यांनी ट्रीटमेंट घेतली. यासाठी त्यांना मुंबईतलं घरंही विकावं लागलं.
8 / 10
या अपघातामुळे त्यांच्या करिअरला अनपेक्षित ब्रेक लागला. काम सुटलं, नातेवाईक अन् इंडस्ट्रीनेही पाठ फिरवली.
9 / 10
मध्यंतरी काही वर्षांपूर्वी सुरेखा राणे या पुन्हा चर्चेत आल्या होत्या. राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने C ग्रेड कलाकारांना मिळणारी पेन्शन त्यांना दिली जाते.
10 / 10
त्या हयात आहेत का? ही माहिती घेण्यासाठी त्यांना फोन आला होता असं त्यांनी सांगितलं होतं. पण, त्यानंतर मात्र त्या पुन्हा गायब झाल्या. आता त्या काय करतात हे कोणालाच माहीत नाही.
टॅग्स :अशोक सराफमराठी अभिनेतासिनेमा