८१व्या वर्षीही व्यसनापासून दूर कसे राहिले दिलीप प्रभावळकर? अभिनेत्याने दिलं मजेशीर उत्तर, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 16:02 IST
1 / 9'दशावतार' सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमात दिलीप प्रभावळकर हे मुख्य भूमिकेत आहेत. त्यांनी साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. 2 / 9या सिनेमाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी दिलेल्या मुलाखतींमधून दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलूही उलगडत आहेत. 3 / 9दिलीप प्रभावळकर यांनी वयाची ऐंशी पार केली आहे. मात्र अजूनही ते तितकेच फिट दिसतात. 4 / 9एक सो एक हिट सिनेमे त्यांनी सिनेसृष्टीला दिले. मात्र सिनेसृष्टीच्या ग्लॅमरसपणाला ते भुलले नाहीत. 5 / 9इतका मोठा नट पण ते व्यसनापासून अलिप्त राहिले आणि कधीच यामागे अडकले नाहीत. एबीपी माझाच्या मुलाखतीत दिलीप प्रभावळकर यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. 6 / 9८१व्या वर्षीही व्यसनापासून दूर कसे राहिले याचं दिलीप प्रभावळकरांनी अतिशय मजेशीर पद्धतीने उत्तर दिलं. 7 / 9 ते म्हणाले, 'पहिली गोष्ट म्हणजे मी खरोखरच सभ्य असलं पाहिजे. दुसरं म्हणजे माझ्या मनात असं काही करावंसं वाटत असतं. पण माझ्यात ते करण्याची डेरिंग नाही'.8 / 9 'आणि तिसरी शक्यता अशी की सगळं करून सावरुन मी नामानिराळा राहण्याइतका हुशार आहे. आता तुम्ही ठरवा यातलं काय कारण असू शकतं'.9 / 9दरम्यान, दशवतार हा सिनेमा १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.