साऊथ इंडियन आहे 'हा' मराठी अभिनेता, 'दशावतार'मध्ये केलंय काम, म्हणतो- "मी एकही साऊथ सिनेमा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 15:10 IST
1 / 8सध्या 'दशावतार' सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या बाबुलीचं सर्वत्र कौतुक होत आहे. 2 / 8'दशावतार'मध्ये दिलीप प्रभावळर यांच्यासोबत आणखी एका अभिनेत्याची मुख्य भूमिका आहे. ज्याने अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. 3 / 8हा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ मेनन. पण तुम्हाला माहितीये का सिद्धार्थ हा मराठी नाहीये. 4 / 8सिद्धार्थ हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने जून, पोश्टर गर्ल, राजवाडे अँड सन्स, अँड जरा हटके, पोपट, एकुलती एक या सिनेमांमध्ये काम केलं आहे. 5 / 8पण, सिद्धार्थ मराठी नसून साऊथ इंडियन आहे. तो मुळचा केरळचा आहे. पण, त्याने अद्याप एकाही साऊथ सिनेमात काम केलेलं नाही. 6 / 8'मी केरळचा असलो तरी महाराष्ट्राचा मुलगा आहे. त्यातही मी पुण्याचा आहे. मी मराठीच आहे आणि लहानपणापासून मराठी सिनेमे पाहिले आहेत', असं त्याने मुलाखतीत म्हटलं होतं. 7 / 8मराठीसोबतच सिद्धार्थने काही हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे. रॉकस्टार, कारवान, सोलो, टाइम मशीन अशा हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. 8 / 8'दशावतार'मुळे सिद्धार्थ चर्चेत आला आहे. या सिनेमात त्याने बाबुलीचा मुलगा माधव ही भूमिका साकारली आहे.