By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 11:01 IST
1 / 8'दशावतार' हा मराठी सिनेमा सध्या सगळीकडे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसलेल्या या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 2 / 8'दशावतार' सिनेमामुळे मराठी सिनेमाला अच्छे दिन आले आहेत. प्रदर्शित झाल्यापासूनच सिनेमाचे सर्व शो हाऊसफूल होत आहेत. 3 / 8दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाच्या ताकदीचं आणि कोकणातील परंपरा, निसर्गसौंदर्याचं दर्शन घडवणारा 'दशावतार' प्रेक्षकांच्या काळजाला थेट हात घालत आहे. 4 / 8'दशावतार' सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. सहाव्या दिवशीही सिनेमाने कोटींमध्ये कमाई केली आहे. 5 / 8सुबोध खानोलकरांनी दिग्दर्शित केलेला 'दशावतार' सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १.३५ कोटींचा गल्ला जमवू शकला आहे. 6 / 8सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, आत्तापर्यंत या सिनेमाने एकूण ८.१५ कोटींचा बिजनेस केला आहे. 7 / 8'दशावतार'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून बॉलिवूड चित्रपटांवरही सिनेमा भारी पडल्याचं दिसत आहे. 8 / 8या सिनेमात दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, भरत जाधव, सुनील तावडे, महेश मांजरेकर, अभिनय बेर्डे अशी स्टारकास्ट आहे.