By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 12:14 IST
1 / 8मराठी कलाविश्वातील रॉकिंग गायक, दिग्दर्शक, संगीतकार म्हणजे अवधूत गुप्ते. आजवर अवधुतने मराठी कलाविश्वाला अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत.2 / 8सध्या अवधूत त्याच्या खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमामुळे चर्चेत येत आहे. आतापर्यंत या कार्यक्रमात राजकीय व्यक्तींपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.3 / 8मुंबई,पुणे अशा धकाधकीच्या शहरांमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला एखाद्या खेड्यात, डोंगराच्या पायथ्याशी आपलं घर असावं असं वाटतं. याला अवधूतदेखील अपवाद नाही.4 / 8मुंबईत राहणाऱ्या अवधूतचा एक सुंदर फार्म हाऊस आहे. बऱ्याचदा रोजच्या रुटीनचा कंटाळा आल्यावर अवधूत या फार्म हाऊसवर जातो.5 / 8पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या जयतपाड या गावात त्याचा प्रशस्त फार्म हाऊस आहे.6 / 8गुप्ते फार्महाऊस असं त्याच्या हा फार्महाऊसचं नाव आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी मोठी हिरवळ असल्याचं पाहायला मिळते.7 / 8अवधूतने प्रचंड मोठं, प्रशस्त असं फार्महाऊस बांधलं असून यात स्विमिंग पूल वगैरेदेखील आहे.8 / 8बऱ्याचदा अवधूतचे मित्रमंडळीदेखील या फार्म हाऊसला भेट देत असतात.