Join us
Daily Top 2Weekly Top 5

अतुल गोगावले यांच्या लेकाचं अभिनय क्षेत्रात पदार्पण; 'राजा शिवाजी' सिनेमाच्या गाण्यात दिसली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 13:52 IST

1 / 7
सध्या रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची खूप उत्सुकता आहे. रितेश देशमुखच्या या सिनेमात संगीतकार अजय-अतुल या जोडीपैकी अतुल गोगावलेंचा लेक रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे.
2 / 7
'राजा शिवाजी' सिनेमाच्या गाण्यात अतुल गोगावलेंचा लेक आर्य गोगावलेची झलक बघायला मिळाली. 'राजा शिवाजी' सिनेमाचं जे अँथम साँग रिलीज झालं त्यात आर्य बघायला मिळाला.
3 / 7
अतुल गोगावले यांनी सोशल मीडियावर लेकाचा फोटो पोस्ट करुन सर्वांना ही आनंदाची बातमी दिली. आर्यला अभिनय करताना पाहताच अनेकांनी त्याचं कौतुक आणि अभिनंदन केलं आहे.
4 / 7
'राजा शिवाजी' सिनेमात झळकणारी अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिनेही आर्यच्या पदार्पणाचं कौतुक केलंय. ''आम्हाला तुझा अभिमान आहे. आमचं प्रेम आणि आशीर्वाद कायमच तुझ्या पाठीशी आहे'', अशा शब्दांमध्ये तिने आर्यवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
5 / 7
आर्य स्पोर्ट्सच्या दुनियेतही सक्रीय असून त्याला किकबॉक्सिंगची आवड आहे. त्याने किकबॉक्सिंग प्रकारात २ सुवर्णपदकंही मिळवली आहेत. एकूणच खेळाची दुनिया गाजवून आर्य आता मोठा पडदा गाजवायलाही सज्ज आहे.
6 / 7
'राजा शिवाजी' सारख्या इतक्या मोठ्या प्रोजेक्टचा भाग झाल्यामुळे आर्य सध्या आनंदात आहे. अजय-अतुल यांच्या चाहत्यांना आणि आर्यच्या मित्र-मैत्रिणींना त्याला मोठ्या पडद्यावर बघण्याची नक्कीच उत्सुकता असेल यात शंका नाही.
7 / 7
'राजा शिवाजी' सिनेमात आर्य कोणती भूमिका साकारणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 'राजा शिवाजी' सिनेमा १ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
टॅग्स :राजा शिवाजी चित्रपटरितेश देशमुखजेनेलिया डिसूजामराठी अभिनेतामराठी चित्रपट