1 / 8महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री अशोक सराफ यांचा आज वाढदिवस आहे. अशोक सराफ त्यांचा ७८वा वाढदिवस साजरा करत आहे. 2 / 8गेली कित्येक दशकं प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करणारे अशोक सराफ हे प्रेक्षकांचे लाडके मामा आहेत. त्यांना सिनेसृष्टीतही सगळे जण अशोक मामा या नावानेच हाक मारतात. 3 / 8पण, अशोक सराफ यांना लोक मामा का म्हणतात? आणि त्यांना पहिल्यांदा अशोक मामा म्हणून हाक कोणी मारली होती? हे तुम्हाला माहितीये का? 4 / 8अशोक सराफ यांनीच खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात यामागचा किस्सा सांगितला होता. 5 / 8अशोक सराफ हे कोल्हापुरात एका सिनेमाचं शूटिंग करत होते. कोल्हापुरात मामा म्हणणं हे मानाचं समजलं जातं. 6 / 8त्या शूटिंग सेटवर एक कॅमेरामॅन त्यांच्या छोट्या मुलीला घेऊन सेटवर आले होते. त्यांनी मुलीला अशोक सराफ यांची ओळख अशोक मामा अशी करून दिली होती. 7 / 8आपल्या मुलीला मामा म्हणायला सांगताना ते कॅमेरामॅनही अशोक सराफ यांना मामा म्हणू लागले. त्यानंतर मग सेटवरील स्पॉटबॉयही त्यांना मामा म्हणून हाक मारू लागले. 8 / 8त्यानंतर हळूहळू सगळ्यांचेच अशोक सराफ मामा झाले. 'लोक मला मामा म्हणतात याचं मला सुख जास्त वाटतं', असं अशोक सराफ म्हणाले होते.