अंड्या, अक्की, केजो, कोको...; ‘या’ मराठी कलाकारांची टोपण नावं तुम्हाला माहित आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 08:00 IST
1 / 15मराठी चित्रपटसगृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना मराठी इंडस्ट्रीमध्ये मामा या नावानं ओळखलं जातं. त्यांना सगळेजण अशोक मामा असं प्रेमाने म्हणतात. एका चित्रपटाच्या सेटवर प्रकाश शिंदे नावाचे एक कॅमेरामॅन होते. त्यांच्या मुलीनेच अशोक सराफांना मामा हे नाव दिलं. 2 / 15नाना पाटेकर हे नाव कोणाला माहित नाही? पण कदाचित त्यांचं खरं नाव अनेकांना ठाऊक नसेल. नानांचं खरं नाव विश्वनाथ आहे. पण आज सगळेच त्यांना नाना म्हणूनच हाक मारतात. 3 / 15अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक याला लाडाने मित्रमंडळी काय हाक मारतात माहितीये? तर पश्या. होय, पश्या याच नावानं तो मराठी चित्रपटसृष्टीत ओळखला जातो. सध्या प्रसाद ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमध्ये परिक्षक म्हणून काम करतोय.4 / 15मराठी चित्रपटसृष्टीत अनेक हिट सिनेमे देणारा अंकुश चौधरी याला ‘अक्की’ या टोपणनावाने ओळखलं जातं. सगळे जवळचे मित्रमंडळी त्याला अक्की याच नावाने हाक मारतात.5 / 15मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतचं लाडाचं नाव फारच मजेशीर आहे. होय, तेजस्विनीला मनोरंजन सृष्टीत बंड्या या टोपणनावाने ओळखलं जातं.6 / 15अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे याला शाळेत असल्यापासूनच एक टोपण नाव मिळालं. होय, सगळे त्याला ढोम्या म्हणायचे. आजही त्याचे बालमित्र त्याला याच नावाने हाक मारतात. 7 / 15 आपल्या हटक्या विनोदी शैलीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा सिद्धार्थ जाधव याला मराठी इंडस्ट्रीत ‘सिद्धू’ या टोपण नावाने हाक मारली जाते. अनेक चाहतेही त्याला याच नावाने ओळखतात.8 / 15मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिचं टोपणनाव फारचं मजेशीर आहे. होय, वडिल तिला लहानपणी बिट्टा या नावानं बोलवायचे. पुढे घरचे सगळेच तिला बिट्टा म्हणू लागलेत. 9 / 15मराठीमधील हँडसम हँक असलेल्या अभिनेता भूषण प्रधान याचं टोपण नाव काय माहितीये? तर बिट्टू. 10 / 15सुयश टिळक याला एक नाही तर दोन दोन टोपण नावं आहेत. होय, सुटी आणि मम्मा या नावानं जवळचे लोक त्याला हाक मारतात.11 / 15अभिनेत्री क्षिती जोग हिचं टोपण नाव केजो आहे. मित्रवर्गात ती याच नावानं फेमस आहे.12 / 15अभिनेत्री क्रांती रेडकर हिचं टोपणनाव तर फारच भारी आहे. होय, कोको असं तिला लाडाने म्हटलं जातं.13 / 15अभिनेते आनंद इंगळे यांचं टोपण नाव ऐकून तुम्हाला हसू येईल. होय, मित्रपरिवार त्यांना अंड्या याच नावाने ओळखतो.14 / 15अभिनेता अमेय वाघ हा अम्या या नावानं ओळखला जातो. मराठी इंडस्ट्रीत सर्वजण त्याला याच नावानं ओळखतात.15 / 15ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी यांचं टोपण नाव तुम्हाला माहित असेलच. होय, त्यांना सगळे बाप्पा याचं नावानं ओळखतात.