By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 15:31 IST
1 / 7संगीतविश्वातील दोन भावांची लोकप्रिय जोडी म्हणजेच अजय-अतुल. दोघांनी मराठीसोबतच हिंदीमध्येही सुपरहिट गाणी दिली आहेत. सध्या ते 'राजा शिवाजी' सिनेमामुळे चर्चेत आहेत.2 / 7अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांच्या संगीत कारकीर्द मोठी आहे. २००४ साली 'अगं बाई अरेच्चा' सिनेमातील गाण्यांमुळे त्यांना ओळख मिळाली. नंतर 'सावरखेड एक गाव','जोगवा', 'नटरंग', 'लय भारी','सैराट' अशा अनेक सिनेमांमधील त्यांची गाणी आजही रसिकांमध्ये लोकप्रिय आहेत.3 / 7या जोडीने हिंदीतही अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. 'अग्नीपथ', 'सिंघम', 'धडक' अशा सिनेमांसाठी त्यांनी संगीत दिग्दर्शन केलं.4 / 7अजय-अतुल यांच्यातील अजय गोगावले हे स्वत: गायकही आहेत. 'देवाक काळजी','वेड तुझा' अशी एकापेक्षा एक गाणी त्यांनी गायली. त्यांच्या आवाजाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे.5 / 7अजय गोगावले यांची पत्नीचं नाव रोहिणी आहे. त्यांना दोन मुलं आहेत. रोहिणी यांचा स्वत:चा क्लोदिंग ब्रँड आहे. 6 / 7आज अजय आणि रोहिणी लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त रोहिणी यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. त्या लिहितात, 'हा दिवस आयुष्यात मोठा बदल घेऊन आला. प्रेम, आपुलकी, एकमेकांचं होणं काय असतं हे तू मला शिकवलंस. आपण एकत्र विणलेल्या या नात्यातील प्रत्येक धाग्यासाठी मी कृतज्ञ आहे—मग ते हसणं असो, अश्रू असो किंवा ते साधे क्षण जे तुझ्या सोबत असल्यामुळे खास बनले. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, माय लव्ह!'7 / 7तर दुसरीकडे अतुल गोगावले यांनाही दोन मुलं आहेत. त्यांचा मोठा मुलगा आर्य गोगावले आता 'राजा शिवाजी'मध्ये दिसणार आहे.