प्राजक्ता माळीला कोणता पदार्थ जास्त आवडतो? अभिनेत्रीने दिलेलं उत्तर ऐकून चकीत व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 11:54 IST
1 / 7मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) ही सर्वांची लाडकी अभिनेत्री. प्राजक्ताने नुकतीच MHJ Unplugged या पॉडकास्टमध्ये मुलाखत दिली2 / 7त्यावेळी मुलाखतकार अमित फाळकेंनी प्राजक्ताला तिच्या आवडत्या पदार्थाबद्दल विचारलं. प्राजक्ताने जो पदार्थ सांगितला तो ऐकून तुम्हीही चकीत व्हाल3 / 7 प्राजक्ता माळी मोठ्या पडद्यावर विविध भूमिका साकारताना दिसते. पडद्यावर ग्लॅमरस दिसणारी प्राजक्ता खऱ्या आयुष्यात मात्र सर्वसामान्य माणसांसारखं जीवन जगते.4 / 7प्राजक्ता माळीने MHJ Unplugged ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, मी अतिशय रुक्ष आयुष्य जगतेय. अतिशय सोपं-साधं आयुष्य जगायला मला आवडतं5 / 7प्राजक्ता पुढे म्हणाली, वरण-भात आणि तूप ही माझी आवडती डिश आहे. अशाप्रकारे प्रत्यक्ष आयुष्यात प्राजक्ताला साधं राहणीमान आणि साधा आहार घ्यायला आवडतो6 / 7अनेकांना प्राजक्ताने सांगितलेला या पदार्थाचं नाव ऐकून चकीत व्हायला झालं. कोणत्याही चमचमीत पदार्थाचं नाव न सांगता वरण-भात-तूप असं प्राजक्ता म्हटल्याने अनेकांनी तिचं कौतुक केलं.7 / 7एकूणच सेलिब्रिटी ग्लॅमरच्या दुनियेत वावरत असले तरीही प्रत्यक्ष आयुष्यात ते साधं राहणीमान पसंत करतात. प्राजक्ता माळी ही अशाच सेलिब्रिटींचं उदाहरण आहे