ये घर बहुत हसीन है, खूपच सुंदर आहे हेमांगी कवीचे घर, पहिल्यांदाच बघा Inside Photo
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 14:31 IST
1 / 8हेमांगीने सिनेसृष्टीत मोठ्या मेहनतीने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. हे स्वप्नपूर्ण करण्यासाठी हेमांगीने प्रचंड मेहनत केली आहे. हेमांगी कवीने मुंबईत काही वर्षापूर्वीच हा सुंदर फ्लॅट खरेदी केला. 2 / 8घर घेतल्याचा आनंद तिने चाहत्यांसही शेअर केला होता. मुंबईत घर घेणे हेमांगीसाठी तितके सोपे नव्हते. घर घेण्यासाठी केलेला संघर्षामुळेच तिचे स्वप्न पूर्ण झाले. 3 / 8तिचा आनंद शेअर करताना तिने सांगितले होते की,मुंबई सारख्या ठिकाणी घर घेणं आमच्या सारख्यांना अशक्य आहे हे खूप आधीच आमच्या लक्षात आलं होतं. म्हणून मग 'म्हाडा' मध्ये सलग 8 वर्ष प्रयत्न केल्यावर एकदाची 2016 मध्ये मला लॉटरी लागली आणि बोरीवलीत आम्हांला घर लाभलं. 4 / 8तोपर्यंत आम्ही भाडेतत्त्वावर कधी दादर तर कधी दहिसर मध्ये रहायलो.पण प्रत्यक्षात घर हातात यायला नोव्हेंबर 2019 उजाडलं. पोजेशेनचे सर्व तांत्रिक सोपस्कार आटपून आणि आम्हांला हवी तशी सजावट करून घेऊन फेब्रुवारीमध्ये आम्ही आमच्या हक्काच्या घरात 'गृहप्रवेश' केला.5 / 8त्यावेळी आम्ही दोघे ही मालिकांमध्ये प्रचंड व्यस्त होतो आणि नंतर मार्चमध्ये कोरोनामुळे आम्ही गावी निघून गेलो. 4 महिने साताऱ्याला राहून आम्ही जून मध्ये आमच्या या नवीन घरात परतलो. 6 / 8पण मग जून पासूनच पुन्हा कामं सुरू झाली आणि आम्ही वेगवेगळ्या शहरात शूटिंगसाठी निघून गेलो. त्यामुळे खूप काळ आम्हांला आमच्या या नवीन घरात राहायलाच मिळालं नाही किंवा कुठलेच सण नीटसे साजरे करता आलेच नाहीत.7 / 8पण मग यावेळी मात्र काहीही झालं, कितीही व्यस्त असलो तरी 'दिवाळी' सुट्टी घेऊन आपल्या या पहिल्यावहिल्या, नवीन, हक्काच्या घरात साजरी करायचीच असं ठरवून टाकलं.8 / 8अशा प्रकारे नवीन घरात पहिल दिवाळी साजरी करतानाचा आनंद शेअर केला होता.आमचा पाडवा या नवीन, हक्काच्या घरात साजरा केल्याचा भावना तिने चाहत्यांसह शेअर केली होती.