Join us
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या राजघराण्यातील मुलगी! पहिल्याच सिनेमातून झाली स्टार, प्रसिद्धीच्या शिखरावर असताना इंडस्ट्री सोडली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 18:06 IST

1 / 7
१९८९ मध्ये ब्लॉकबस्टर 'मैंने प्यार किया' या पहिल्याच चित्रपटातून स्टारडम मिळविणारी अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री पटवर्धन.
2 / 7
भाग्यश्री पटवर्धनचा जन्म २३ फेब्रुवारी १९६९ रोजी सांगली येथे मराठी राजघराण्यात झाला. तिचे आजोबा चिंतामणराव धुंडीराव पटवर्धन हे सांगलीचे शेवटचे राज्यकर्ते होते.
3 / 7
भाग्यश्रीचे वडील विजय सिंहराव माधवराव पटवर्धन यांना 'सांगलीचा राजा' ही उपाधी आहे. तिने मिठीबाई कॉलेज, मुंबई येथून बॅचलर ऑफ कॉमर्स (B.Com.) केले. १९८७ मध्ये लुईसा मे अल्कॉटच्या 'लिटिल वुमन' चे रूपांतर असलेल्या 'कच्ची धूप' या दूरचित्रवाणी मालिकेतून भाग्यश्री पटवर्धनने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
4 / 7
१९८९ साली भाग्यश्रीची प्रमुख भूमिका असलेला मैने प्यार किया हा प्रदर्शित झाला होता. सलमान खान बरोबरचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, भाग्यश्रीने संपूर्ण सिनेसृष्टीचे लक्ष वेधून घेतलं. चित्रपटाच्या प्रचंड यशामुळे अभिनेत्री रातोरात स्टार झाली.
5 / 7
या चित्रपटाच्या यशानंतर तिने 'कैद मैं है बुलबुल'; के.सी. बोकाडिया यांच्या 'त्यागी' आणि महेंद्र शाह यांच्या 'पायल' या चित्रपटातून अभिनय केला. मात्र, या चित्रपटांना फारसं यश मिळालं नाही.
6 / 7
'मैने प्यार किया' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तिने हिमालय दसानी यांच्याशी विवाह केला होता. त्यानंतर ती संसारात रमली. भाग्यश्रीने २००० च्या दशकाच्या मध्यात 'मां संतोषी मां' (२००३) 'हमको दीवाना कर गए' (२००६) आणि 'रेड अलर्टः द वॉर विदिन' (२०१०) या चित्रपटांद्वारे हिंदी चित्रपटांद्वारे कमबॅक केलं. त्याचबरोबर काही तिने 'लौट आओ त्रिशा', या मालिकेतही अभिनय केला.
7 / 7
२०२३ मध्ये भाग्यश्री 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामध्ये ३४ वर्षांनंतर झळकली. आता लवकरच ही अभिनेत्री 'राजा शिवाजी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'राजा शिवाजी'मध्ये स्वराज्यजननी 'राजमाता जिजाऊ' यांच्या भूमिकेत ती दिसणार आहे.
टॅग्स :राजा शिवाजी चित्रपटभाग्यश्रीरितेश देशमुखसिनेमा