Join us
Daily Top 2Weekly Top 5

"लग्नाच्या वेळी मी पैसे बर्बाद केले..."; अमृता खानविलकरचा खुलासा, मनातली खंत केली व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 12:49 IST

1 / 7
अमृता खानविलकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. अमृता खानविलकरने खऱ्या आयुष्यात हिमांशू मल्होत्रासोबत लग्न केलं.
2 / 7
हिमांशूसोबत अमृताच्या लग्नाला आज १० पेक्षा जास्त वर्ष पूर्ण झाली आहेत. इतक्या वर्षांनंतर लग्नात पैसे उगाच खर्च केले, असं स्पष्ट मत अमृताने मांडलं आहे. काय म्हणाली अमृता?
3 / 7
अमृता नुकतीच अभिनेत्री भारती सिंग आणि हर्ष लिम्बाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी अमृताने तिच्या लग्नाबद्दल मनमोकळं केलं. अमृता जे बोलली ते महत्वाचं आहे.
4 / 7
''एकाक्षणी असं वाटलं की, मी का लग्न केलं? म्हणजे लग्नाच्या वेळी मी पैसे इतके बर्बाद केलेत. थोडेसे पैसे साठवायला हवे होते. परंतु आता पैसे मी वाया घालवले आहेत, असं वाटतं. त्यानंतर आम्हाला घरही घ्यायचं होतं'', असं अमृता म्हणाली.
5 / 7
''आज थोडे म्हातारे झाले आहोत ना, त्यामुळे मी - हिमांशू आम्ही यावर बोलतो. त्यानंतर आम्ही नच बलिएमध्ये पैसेही कमावले, नावही कमावलं. सर्व काही आहे पण त्यावेळी लग्नात जे पैसे खर्च झाले त्याबद्दल आता वाटतं.'', असंही अमृता म्हणाली.
6 / 7
अमृता खानविलकर शेवटी म्हणाली, ''कारण आपण कलाकार आहोत. प्रत्येक वेळी काम असेलच असं नाही.''अशाप्रकारे अमृता खानविलकरने त्यावेळी लग्नात पैसे वाचवले असते तर बरं झालं असतं असं मत व्यक्त केलंय.
7 / 7
अमृता खानविलकरने सांगितलेली ही गोष्ट खूप महत्वाची आहे. लग्नात जास्त पैसे खर्च न करता त्याची बचत करुन ते पैसे इतर कामांसाठी वापरता आले असते, असं अमृताचं म्हणणं आहे 
टॅग्स :अमृता खानविलकरलग्नबॉलिवूडमराठी अभिनेतामराठी चित्रपट