Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सागर किनारे...' 'लाफ्टर क्वीन' नम्रता संभेराव रमली ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी, फोटो पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 15:55 IST

1 / 7
अभिनय किंवा कलाविश्वाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना नम्रताने या क्षेत्रात नाव कमावलं. कधी काळी मालिकांमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करणारी नम्रता आज महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. नम्रता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
2 / 7
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून नम्रता संभेराव घराघरात पोहचली. अभिनय आणि विनोदाची उत्तम सांगड घालत नम्रता प्रेक्षकांना खळखळवून हसवते.
3 / 7
प्रत्येक एपिसोडमध्ये नम्रताच्या अभिनयाचा मॅडनेस पाहायला मिळतो. आपलं टॅलेंट आणि अपार मेहनतीच्या जोरावर नम्रताने मराठी कलाविश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. पण, विनोदाचं अचूक टायमिंग साधत रसिकांचं मनोरंजन करणाऱ्या नम्रतासाठी अभिनय क्षेत्रातील हा प्रवास सोपा नव्हता.
4 / 7
'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर 'पुढचं पाऊल', 'लज्जा', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या.
5 / 7
मिस लॉली, शिक्षिका, शाळकरी मुलगी किंवा ओंकारची आई अशी अनेक पात्र नम्रताने घराघरात पोहोचवली. नम्रता सोशल मीडियावरही व बरीच सक्रिय असते.
6 / 7
सध्या हास्यजत्रेची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दरम्यान, नम्रताने ऑस्ट्रेलियाती समुद्रकिनारी तिचे काही क्लिक केलेले खास फोटो शेअर केलेत.
7 / 7
नम्रताने केलेल्या फोटोशूटमध्ये पांढरा टी-शर्ट, गुलाबी रंगाची ट्राऊझर असा परफेक्ट लूक तिने केलाय. शिवाय डोळ्यांना लावलेल्या गॉगलमुळे नम्रताचा कुल अंदाज पाहायला मिळतोय.
टॅग्स :नम्रता आवटे संभेरावमहाराष्ट्राची हास्य जत्राटेलिव्हिजन