Join us
Daily Top 2Weekly Top 5

"दोन-तीन वेळा माघार घेतलीये, कारण...", लव्ह लाईफबद्दल प्राजक्ता माळी नेमकं काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 18:48 IST

1 / 7
प्राजक्ता माळी ही मराठीतील सिनेविश्वातील आघाडीची आणि चाहत्यांची लाडकी अभिनेत्री आहे.
2 / 7
प्राजक्ताचा चाहतावर्ग मोठा आहे. ती तिच्या कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.
3 / 7
'जुळून येती रेशीमगाठी','नकटीच्या लग्नाला यायचं हं' यांसारख्या मालिकांमधून ती घराघरात पोहोचली. प्राजक्ताने करिअरमध्ये मालिका तसेच चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
4 / 7
दरम्यान, प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री लग्न कधी करणार याबद्दल अनेकांना जाणून घेण्यास उत्सुकता असते.एका मुलाखतीत प्राजक्ता माळीने अद्याप ती सिंगल असल्याचे सांगितलं होतं. तसेच तिने तिच्या लग्नाबद्दल खुलासा देखील केला.
5 / 7
'मुक्काम पोस्ट मनोरंजन'या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या लव्ह लाईफबद्दल भाष्य केलं होतं. त्यादरम्यान अभिनेत्री म्हणाली,'२०१३ पासून मी मुंबईमध्ये एकटी राहतेय. त्यामुळे मला स्वातंत्र्याची सवय लागलीये.एक कलाकार म्हणून मी मुक्त आहे.त्यामुळे मला बंधनात अडकण्याची भीती वाटते.आता लग्नसंस्था ज्याप्रकारे विस्कळीत होत चालली आहे.त्यामुळे जरा भीती वाटते.'
6 / 7
त्यानंतर अभिनेत्री सांगितलेलं की,'मी तेवढी प्रेमात नाही पडले आणि जेव्हा प्रेमात पडले तेव्हा कळलं की समोरची व्यक्ती माती खात आहे. त्यामुळे मी दोन-तीन वेळा माघार घेतली आहे.'असा खुलासा अभिनेत्रीने मुलाखतीत केला.
7 / 7
अलिकडेच प्राजक्ता माळी'फुलवंती'या चित्रपटामध्ये दिसली. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच प्राजक्ता माळी उत्तम सूत्रसंचालिका देखील आहे.
टॅग्स :प्राजक्ता माळीमराठी चित्रपटसेलिब्रिटी