By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 17:08 IST
1 / 7'स्वप्नांच्या पलीकडले', 'सूर राहुदे' यांसारख्या मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत गौरी नलावडे हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहचलं. 2 / 7छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत अभिनेत्रीने चाहत्यांची मनं जिंकली. 3 / 7मालिकाविश्व गाजवल्यानंतर गौरीने काही मराठी चित्रपटांमध्येही मुख्य भुमिका साकारल्या. 4 / 7'कान्हा', 'गोदावरी' या सिनेमांमध्ये काम करून तिने मराठी मनोरंजन विश्वात आपला दबदबा निर्माण केला.5 / 7अभिनेत्री गौरी नलावडे सोशल मीडियावर सक्रिय असून या माध्यमातून ती तिच्या आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करते. 6 / 7गुढीपाडव्याच्या निमित्ताने अभिनेत्रीने तिचे साडीतील काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर ''So pretty uff! '' अशी प्रतिक्रिया अभिनेत्री सई ताम्हणकरने दिली आहे. 7 / 7हिरवी साडी त्यावर स्लिव्हलेस ब्लाऊज तसेच नाकात घातलेली कारवारी नथ तिला अगदी शोभुन दिसते. शिवाय या पारंपरिक पेहरावावर परिधान केलेल्या मोत्यांच्या दागिन्यांनी गौरीच्या सौंदर्यात भर घातली आहे.