Join us  

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडप्याची लंडनवारी; पत्नीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने दिलंय हे खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 5:33 PM

1 / 7
आस्ताद काळेने अभिनेत्री स्वप्नाली पाटीलसोबत लग्न केलं आहे. जवळपास ३ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली.
2 / 7
आस्ताद आणि स्वप्नाली १४ फेब्रुवारी २०२१ मध्ये विवाहबंधनात अडकले. एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान या दोघांची भेट झाली आणि कालांतराने या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं.
3 / 7
स्टार प्रवाहवरील 'पुढचं पाऊल' या लोकप्रिय मालिकेतही त्यांनी एकत्र काम केलंय.
4 / 7
सध्या हे कपल लंडन सफारीचा आनंद लूटताना दिसत आहे. पत्नी स्वप्नाली पाटीलच्या वाढदिवसानिमित्त आस्तादने तिला हे अनोखं गिफ्ट दिलं आहे.
5 / 7
याचे फोटो चक्क या दोघांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर अकाउंटवरून शेअर केले आहेत.
6 / 7
जगप्रसिद्ध आयफेल टॉवरच्या समोर स्वप्नालीने वेगवेगळ्या पोझ देत आपले फोटोज काढलेत.
7 / 7
या फोटोंवर ''Thank you soooo much @aastadkale for the most beautiful and wonderful birthday gift'' असं कॅप्शन स्वप्नालीने आस्तादला टॅग करत दिल्याचं पाहायला मिळतंय.
टॅग्स :अस्ताद काळेस्वप्नाली पाटीलटेलिव्हिजनसेलिब्रिटी