By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 10:48 IST
1 / 8मराठी कलाविश्वातील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकत असते. परंतु, यावेळी ती तिच्या नव्या फोटोशूटमुळे प्रेक्षकांची मनं जिंकतांना दिसत आहे.2 / 8अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकलेली सोनाली सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती तिच्या जीवनातील काही घटना, प्रसंग चाहत्यांसोबत शेअर करत असते.3 / 8सध्या सोनाली तिच्या आगामी 'झिम्मा' या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटाशी संबंधित अनेक अपडेट्स तिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना दिले आहेत.4 / 8सोनालीने अलिकडेच एक सुंदर फोटोशूट केलं असून त्याचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.5 / 8सोनालीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसून येत आहे. 6 / 8या फोटोमध्ये सोनाली निळ्या रंगाची शेड असलेला आऊटफिट आहे. सोबतच तिच्या चेहऱ्यावरील निखळ हास्याने ती अनेकांना मोहून टाकत आहे.7 / 8सध्या सोनाली पुण्यात तिच्या आगामी 'झिम्मा' चित्रपटाचं प्रमोशन करत असल्याचं सांगण्यात येत आहे.8 / 8 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात तिच्यासोबत सुहास जोशी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले, सिद्धार्थ चांदेकर ही कलाकार मंडळी स्क्रीन शेअर करणार आहेत.