By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 12:38 IST
1 / 8एका मराठी अभिनेत्रीचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फोटोतल्या या चिमुकलीला पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. 2 / 8फोटोमध्ये साडीत दिसणारी ही गोंडस चिमुकली मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. काही मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 3 / 8फोटोत दिसणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव रुचिता जाधव आहे. रुचिताला 'लव्ह लग्न लोचा' या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. 4 / 8पण, तिने 'वीर शिवाजी' या हिंदी मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिने महाराणी सोयराबाईंची भूमिका साकारली होती. 5 / 8'आता माझी हटली', 'भूताचा हनिमून', 'माणूस एक माती', 'जीवनसंध्या', 'पिल्लू बॅचलर', 'भविष्याची ऐशी तैशी' या सिनेमांमध्ये ती झळकली आहे. 6 / 8रुचिता सध्या कलाविश्वात फारशी सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावर मात्र प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. 7 / 8अनेकदा रुचिता तिचे फोटो शेअर करण्यासोबतच चाहत्यांना लाइफ अपडेट्स देत असते. 8 / 8 रुचिता आता एक बिजनेसवुमन आहे. ती स्वत:चा बिजनेस चालवते. २०२१ मध्ये रुचिताने आनंद माने यांच्याशी लग्न करत संसार थाटला असून ती संसारात रमली आहे.