1 / 8पहिल्याच चित्रपटातून रिंकूने प्रेक्षकांना 'याड' लावलं. त्यामुळेच सैराटनंतर ती अनेक चित्रपटांमध्ये झळकली.2 / 8अलिकडेच रिंकूचा झुंड हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने तिला अमिताभ बच्चनसोबत काम करायची संधी मिळाली.3 / 8कलाविश्वासह रिंकू सोशल मीडियावर सक्रीय असून वरचेवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.4 / 8रिंकू वेस्टर्न आऊटफिटसह पारंपरिक मराठमोळ्या साजशृंगारातही तिचे फोटो शेअर करत असते.5 / 8अलिकडेच रिंकूने काळ्या रंगाच्या साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत. या साडीमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.6 / 8रिंकू लवकरच किचन कल्लाकार या कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावणार आहे. या शोवेळी तिने ही साडी परिधान केली होती.7 / 8रिंकूने या फोटोसाठी वेगवेगळ्या सुंदर पोझ देत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.8 / 8रिंकू सध्याच्या घडीला मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने सैराट, कागर, मेकअप, झुंड असा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.