लाइमलाइटपासून दूर आहे रिंकू राजगुरुची आई; तुम्ही पाहिलंय का आर्चीच्या माय माऊलीला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 14:23 IST
1 / 8मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. पहिल्याच सिनेमातून रिंकूने प्रेक्षकांना आपलंसं केलं.2 / 8सैराटनंतर रिंकूने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. त्यात कागर, आठवा रंग प्रेमाचा, मेकअप अशा अनेक सिनेमांचा त्यात समावेश आहे.3 / 8रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.4 / 8रिंकूचा आज मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.5 / 8रिंकूने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.6 / 8रिंकूने इन्स्टाग्रामवर तिच्या आईसोबतचे फोटो शेअर करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच तिची आई तिच्यासाठी सर्व काही आहे असंही तिने या पोस्टमधून सांगितलं आहे.7 / 8रिंकू आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मात्र, तिची आई अत्यंत साधेपणाने राहते. 8 / 8रिंकू अनेकदा मुलाखतींमध्ये तिच्या आईचा उल्लेख करत असते. यात ती तिच्या आईच्या हातच्या जेवणाचं खूप कौतुक करतांना दिसते. रिंकूची हुबेहूब तिच्या आईसारखी दिसत असून अनेकांनी या मायलेकींचं कौतुक केलं आहे.