Join us

'या' अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थामुळे आर्ची होते सैराट; रिंकूने सांगितला फेव्हरेट पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 16:06 IST

1 / 9
पहिल्याच चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना सैराट करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.
2 / 9
उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांना याड लावणाऱ्या या अभिनेत्रीचा आज वाढदिवस. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या तिच्या नावाची चर्चा आहे.
3 / 9
सैराट, कागर, मेकअप या चित्रपटांसह रिंकू काही वेब सीरिजमध्येही झळकली आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग चांगलाच विस्तारला आहे.
4 / 9
रिंकू आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. परंतु, यशाच्या आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही रिंकू अत्यंत साधी राहते.
5 / 9
मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात वाढलेली रिंकू अभिनयासह तिच्या वर्कआऊटकडेही विशेष लक्ष देते.
6 / 9
फिटनेस फ्रिक असेलली रिंकू नेमाने तिचा डाएट आणि वर्कआऊट फॉलो करते. मात्र, तरीदेखील एक मराठमोळा महाराष्ट्रीयन पदार्थ दिसला की ती त्यावर ताव मारते.
7 / 9
एका मुलाखतीत रिंकूने तिचा डाएट प्लॅन आणि तिला आवडणारे पदार्थ सांगितले होते.
8 / 9
रिंकूला पुरणपोळी प्रचंड आवडत असून ती कोणत्याही वेळी पुरणाची पोळी सहज खाऊ शकते.
9 / 9
रिंकू फारशी फुडी नाही त्यामुळे जे असेल ते ती आवडीने खाते. मात्र, तिला तिच्या आईच्या हातचे पदार्थ खासकरुन आवडतात.
टॅग्स :रिंकू राजगुरूसेलिब्रिटीसिनेमा