Join us  

शनायाचा स्टर्निंग लूक; Orgenza साडीत रसिका सुनीलने फ्लॉन्ट केला टॅटू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 7:11 PM

1 / 8
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.
2 / 8
गेल्या काही काळात रसिकाचा कलाविश्वातील वावर थोडा कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
3 / 8
रसिका वरचेवर तिचे फोटो वा व्हिडीओ नेटकऱ्यांसोबत शेअर करत असते. यात असंच एक फोटोशूट तिने केलं आहे.
4 / 8
कधी वेस्टर्न तर कधी पारंपरिक वेशात फोटोशूट करणाऱ्या रसिकाने यावेळी साडीत एक फोटोशूट केलं आहे.
5 / 8
रसिका सोशल मीडियावर सक्रीय असून ती कायम तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफही चाहत्यांसोबत शेअर करत असते.
6 / 8
रसिकाचं प्रत्येक फोटोशूट चर्चेत येत असून यात ती तिचा ग्लॅमरस लूक दाखवत असते.
7 / 8
रसिकाने Orgenza साडीत फोटोशूट केलं आहे. यावेळी तिने गडद जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे.
8 / 8
रसिकाने या साडीवर सिव्हलेस ब्लाऊज घातलं असून यात तिने पाठीवर काढलेला टॅटू तिने फ्लॉण्ट केला आहे.
टॅग्स :रसिका सुनिलसेलिब्रिटीटिव्ही कलाकार