Prajakta Mali : -अन् त्या दिवशी आईने झाडूने झोडपलं..., प्राजक्ता माळीच्या आयुष्यातला किस्सा माहितीये का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 17:58 IST
1 / 10प्राजक्ता माळी ही चाहत्यांची आवडती अभिनेत्री. प्राजक्तावर चाहते जणू फिदा आहेत. तिने एखादा फोटो शेअर केले रे केली की, चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स पडायला लागतात. 2 / 10 प्राजक्ता सोशल मीडियावर रोज नवे फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो क्षणात व्हायरल होतात. पण सध्या प्राजूच्या फोटोंची नाही तर तिच्या आयुष्यातील एक किस्सा चर्चेत आहे.3 / 10होय, एका मुलाखतीत प्राजूने तिच्या डायरीचा किस्सा ऐकवला होता. हा किस्सा सध्या व्हायरल होतोय. हा किस्सा चांगलाच मजेशीर आहे.4 / 10प्राजक्ताला सुरूवातीपासूनच डायरी लिहायची सवय होती. दिवसभर जे काही घडलं ती ते या डायरीत लिहायची. पण याच डायरीमुळे तिला एकदा बेदम मार खावा लागला होता.5 / 10 कॉलेजमध्ये शिकत असताना प्राजक्ताची डायरी तिच्या आईला सापडली. याचाच किस्सा प्राजक्ताने सांगितला होता.6 / 10 तिने सांगितलं होतं, ‘मनाला जे वाटतं ते मी माझ्या डायरीत लिहायचे. आजही माझ्याकडे अनेक वर्षापूर्वीच्या डायरी आहेत. एके दिवशी माझ्या आईला माझी डायरी सापडली. तेव्हा मी अकरावीत शिकत होते.’7 / 10 पुढे ती म्हणाली होती,‘मी कॉलेजमधून घरी आले, आई वाटच बघत होती. घरी आल्यानंतर मला आईने झाडूने बेदम मार दिला. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता मी त्या डायरीत काय काय लिहिलं असेल...’8 / 10प्राजक्ताला अगदी लहानपणापासून डान्सची आवड होती. म्हणून वयाच्या 6व्या वर्षी तिने भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली होती. 9 / 1013 किंवा 14 वर्षांची होती तेव्हा तिने स्टार प्लसवरील ‘क्या मस्ती क्या धूम’ या रिअॅलिटी शोमध्ये तिने भाग घेतला होता. ही स्पर्धा तिने जिंकली देखील होती. 10 / 10प्राजक्तानं 2011 साली ‘सुवासिनी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिनं सावित्री ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर ती जुळून येती रेशिम गाठी, नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकांमध्ये काम केलं.