Join us  

'महाराष्ट्राच्या हास्यजत्रे'चा आता विदेशात धिंगाणा; प्राजक्ता माळीसह टीम पोहोचली सिंगापूरला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2024 2:31 PM

1 / 6
प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारी मालिका म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा.
2 / 6
या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे शो आता देशाबाहेर सुद्धा रंगताना पाहायला मिळतात.
3 / 6
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधून हास्यजत्राची टीम सिंगापूरला पोहोचल्याचं दिसून येत आहे.
4 / 6
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर सिंगापूर दौऱ्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये वनिता खरात, पृथ्वीक प्रताप, समीर चौगुले, ओंकार राऊत आणि संपूर्ण टीम दिसून येत आहे.
5 / 6
प्राजक्ता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम या कार्यक्रमाच्या सेटवरचे फोटो वा व्हिडीओ पोस्ट करत असते.
6 / 6
प्राजक्ताने कोणतेही पोस्ट शेअर केल्यानंतर ती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होते.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटेलिव्हिजनटिव्ही कलाकारप्राजक्ता माळीसमीर चौगुले