Join us
Daily Top 2Weekly Top 5

हृदयात वाजे समथिंग! हृता दुर्गुळेची पतीसोबत युरोप ट्रीप, शेअर केले रोमँटिक Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 13:18 IST

1 / 8
'महाराष्ट्राची क्रश' मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) सध्या नवऱ्यासोबत परदेशात फिरण्याचा आनंद घेत आहे. दोघंही सध्या स्पेनमध्ये असून तेथील फोटो पोस्ट करत आहेत.
2 / 8
हिंदी सीरिअल दिग्दर्शक, निर्माता प्रतीक शाह आणि हृता 2022 साली लग्नबंधनात अडकले. त्यानंतर हे कपल नेहमीच आपल्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतं.
3 / 8
कधी मालदीव तर कधी दुबई अशा अनेक ठिकाणी हृता आणि प्रतीक फिरुन आलेत. आताही ते स्पेन ट्रीपवर गेले असून त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
4 / 8
गडद चॉकलेटी रंगाचा स्वेटशर्ट आणि पँट, डोळ्यावर गॉगल अशा साध्या लूकमध्ये हृता दिसतेय. तर प्रतीकने गुलाबी रंगाचा शर्ट त्यावर पांढरं जॅकेट आणि पँट घातली आहे.
5 / 8
हृता आणि प्रतीकची जोडी पुन्हा एकदा चाहत्यांना भुरळ घालत आहे. त्यांच्या रोमँटिक फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
6 / 8
प्रतीक शाह गुजराती असून त्याने अनेक हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये 'कुछ रंग प्यार के ऐसे भी','बहु बेगम','बेहद २','एक दिवाना था' या मालिकांचा समावेश आहे. तर त्याची आई देखील हिंदी मालिकांमध्ये अभिनय करते.
7 / 8
हृता नुकतीच 'कन्नी' सिनेमात दिसली होती. या सिनेमाच्या प्रमोशन आणि रिलीजनंतर ती प्रतीकसोबत सुट्ट्यांसाठी स्पेनला गेली. काही दिवसांपूर्वीच दोघांनी नवीन घरही घेतलं.
8 / 8
नुकत्याच झालेल्या 'नॅशनल कपल्स डे' निमित्त प्रतीकने हे खास फोटो शेअर केले. या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळतेय.
टॅग्स :ऋता दूर्गुळेमराठी अभिनेतासोशल मीडियाव्हायरल फोटोज्