By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 11:57 IST
1 / 7महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 2 / 7सध्या हृता तिच्या पतीबरोबर व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. वाढदिवस आणि न्यू इयर निमित्त दोघेही युरोपातील अझरबैजानमध्ये गेले आहेत. 3 / 7तेथील फोटो हृताचा नवरा प्रतीक शाह याने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. 4 / 7अझरबैजान हा पर्यटकांचं आकर्षण असलेला देश आहे. या देशातील बर्फाच्छादित प्रदेशात हृता आणि प्रतीक क्वालिटी टाइम घालवत आहेत. 5 / 7हृता आणि प्रतीकच्या रोमँटिक फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांचे हे फोटो जणू बॉलिवूड सिनेमातील सीनच असल्यासारखे वाटत आहेत. 6 / 7'२०२४ ला गुडबाय म्हणत आहोत. आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ घालवत आठवणी बनवत आहोत', असं कॅप्शन प्रतीक शाहने या फोटोंना दिलं आहे. 7 / 7हृता आणि प्रतीकने २०२२ मध्ये लग्न करत संसार थाटला. प्रतीकही कलाविश्वात कार्यरत आहे.