1 / 7'सैराट', 'लापता लेडीज, 'मडगांव एक्सप्रेस' यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवणारी अभिनेत्री म्हणजे छाया कदम.2 / 7अनेक हिंदी मराठी चित्रपटांतून त्यांनी त्यांच्या सकस अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. त्यांच्या अभिनयाचं सगळ्यांनीच कौतुक केलं. 3 / 7अलिकडेच अभिनेत्री छाया कदम कान्स फेस्टिव्हलमुळे चर्चेत आल्या होत्या. सलग दुसऱ्यांदा त्यांनी या फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली. 4 / 7'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मुळे छाया कदम प्रचंड चर्चेत आल्या आहेत. दरम्यान, कान्सनंतर छाया या त्यांच्या मुळगावी कोकणात परतल्या आहेत. कोकणातील निसर्गरम्य वातावरणात त्या रमल्याचं पाहायला मिळत आहेत.5 / 7नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर काही खास फोटो, व्हिडीओ शेअर केले आहे. या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.6 / 7 'कान्स' नंतर छाया कदम त्यांच्या गावी क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहेत. 7 / 7'Cannes to धामापूर...', असं कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिलं आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.