Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन मराठमोळ्या अभिनेत्री गाजवतायेत हिंदी मालिका, एकीचं तर २ वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 15:05 IST

1 / 7
हिंदी टेलिव्हिजनविश्वातही मराठी कलाकारांनी डंका गाजवला आहे. आजही अनेक हिंदी मालिकांमध्ये मराठी चेहरे दिसतातच. त्यातलीच एक मराठमोळी मानसी साळवी.
2 / 7
मानसीने काही वर्षांपूर्वी मराठी मालिका, मराठी सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या. सोज्वळ दिसणं, सुंदर हसणं यातून तिने सगळ्यांनाच प्रेमात पाडलं होतं.
3 / 7
मानसी साळवी काही वर्षांपासून हिंदी मालिकाविश्वात दिसते. 'प्यार का दर्द है', 'कोई अपना सा', 'पवित्र रिश्ता', 'डोली अरमानो की' अशा अनेक मालिकांमधून तिला लोकप्रियता मिळाली आहे.
4 / 7
तर दुसरीकडे आणखी एक मराठी अभिनेत्री स्नेहा वाघही बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये झळकली आहे. 'नीरजा', 'वीरा', 'ज्योती', 'चंद्रगुप्त मौर्या' अशा मालिकांमध्ये ती दिसली आहे.
5 / 7
आता मानसी आणि स्नेहा दोघी एकाच हिंदी मालिकेत एकत्र झळकत आहेत. कलर्स टीव्हीवरील 'महादेव अँड सन्स' या मालिकेत स्नेहा वाघची एन्ट्री झाली आहे. विशेष म्हणजे मालिकेत स्नेहा आणि मानसी दोघी बहि‍णी आहेत.
6 / 7
मानसीने स्नेहासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात त्या खरोखर बहिणींसारख्याच वाटत आहेत. त्यांचा ऑफस्क्रीन बाँड एकदम खास असल्याचं पाहायला मिळत आहे.
7 / 7
विशेष म्हणजे स्नेहाने २ वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक केलं आहे. मधल्या काळात ती कृष्णभक्तीच्या मार्गावर होती. बरेच महिने ती वृंदावनात जाऊन राहायची. आता तिने स्वत:हून पुन्हा टीव्हीवर काम करायचं ठरवलं आहे.
टॅग्स :स्रेहा वाघमराठी अभिनेताटेलिव्हिजनटिव्ही कलाकार