Join us
Daily Top 2Weekly Top 5

ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 21:45 IST

1 / 8
मालती चहर हे नाव सध्या सर्वांनाच माहिती झालं आहे. बिग बॉस हिंदीमुळे ती घराघरात पोहोचली.
2 / 8
बिग बॉसच्या आधीपासूनच भारतातील क्रिकेट चाहते मालती चहर या नावाशी परिचीत आहेत.
3 / 8
सर्वप्रथम IPL सामन्यात कॅमेरामनने तिला प्रकाशझोतात आणले. ती 'मिस्ट्री गर्ल' बनली होती.
4 / 8
त्यानंतर तिच्याबाबत शोध घेतल्यावर, ती क्रिकेटर दीपक चहरची सख्खी बहीण असल्याचे समजले.
5 / 8
मालती त्या सामन्यानंतर अनेकवेळा क्रिकेट स्टेडियममध्ये दिसली आणि तिच्या बातम्याही झाल्या.
6 / 8
काही दिवसांपासून मालती वेगळ्या कारणाने चर्चेत आली. वाईल्ड कार्ड एन्ट्रीमधून ती बिग बॉसमध्ये आली.
7 / 8
बिग बॉसच्या घरात तिने आपली छाप सोडली. मराठमोळ्या प्रणित मोरेशी तिची मस्त गट्टी जमली.
8 / 8
मालतीचं ताजं फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरतंय. पारंपरिक साडीतला ग्लॅमरस लूक सर्वांना भावतोय.
टॅग्स :बिग बॉस १९दीपक चहरव्हायरल फोटोज्