Join us

"नवऱ्याचं आडनाव वापरा पण तुमचं स्वतःचं बँक अकाऊंट काढा"; मलायकाचा महिलांना खास सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 14:50 IST

1 / 10
मलायका अरोरा तिच्या ग्लॅमरस स्टाइलसोबतच बोल्ड पर्सनॅलिटीसाठी ओळखली जाते. ती नेहमीच आपलं मत उघडपणे, मोकळेपणाने मांडते.
2 / 10
आता मलायकाने लग्नाबाबत महिलांसाठी एक स्ट्राँग मेसेज शेअर केला आहे. अभिनेत्रीने महिलांना लग्नानंतर आपली ओळख कायम ठेवण्याचे आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहण्याचं आवाहन केलं आहे.
3 / 10
कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत मलायका अरोरा म्हणाली, 'स्वत:ला स्वतंत्र ठेवा. जे तुझं आहे ते तुझं आहे आणि जे माझं आहे ते माझंच आहे.'
4 / 10
'म्हणजे, जेव्हा तुम्ही लग्न करता किंवा एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुम्ही त्याच्याशी जुळवून घेता. तुम्हाला सर्वकाही एक असावं असं वाटतं. पण स्वतःची ओळख असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं'.
5 / 10
लग्न हे दोन व्यक्तींचं मिलन असलं तरी महिलांनी आपली ओळख टिकवून ठेवणं आणि पैशांच्या बाबतीत कोणावरही अवलंबून न राहणं महत्त्वाचं आहे, असं मलायकाने सांगितलं.
6 / 10
मलायका पुढे म्हणाली, 'लोक एकत्र काम करतात ही चांगली गोष्ट आहे, पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही तुमची संपूर्ण ओळख सोडून दुसऱ्याची ओळख आपल्यासाठी वापरावी.'
7 / 10
'लग्नानंतर महिला आपल्या जोडीदाराचं आडनाव स्वतःच्या नावापुढे जोडतात. अशा परिस्थितीत किमान स्वत:चं एक तरी बँक अकाऊंट काढा.'
8 / 10
मलायका अरोराचं अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झालं आहे. सध्या मलायका सिंगल आहे. मलायका सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.
9 / 10
अभिनेत्रीचे असंख्य चाहते आहेत. तिच्या फिटनेसचं नेहमीच सर्वजण कौतुक करतात. मलायका अरोरा सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
10 / 10
टॅग्स :मलायका अरोरामलायका अरोरा