Join us
Daily Top 2Weekly Top 5

सो क्यूट! 'माझी तुझी रेशीम गाठ' फेम 'परी'चं मकर संक्रातीनिमित्त खास फोटोशूट; पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 22:51 IST

1 / 10
झी मराठी वाहिनीवर सुरू झालेली 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय झाली आहे. अर्थात मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सारखी दमदार स्टारकास्ट देखील आहे. पण यासर्वांमध्येही लक्षवेधलेली चिमुकली म्हणजे चिमुकली परी अर्थात मायरा वायकुळ (Myra Vaikul)
2 / 10
मायरा टेलिव्हिजन वाहिनीमुळे घराघरात पोहोचली असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आधीच सर्वांच्या पसंतीस पडली होती. सोशल मीडियात जबरदस्त फॅन फॉलोइंग असलेल्या मायरानं नुकतंच संक्रातीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे.
3 / 10
मायराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे छान फोटो ट्विट करण्यात आले आहेत. मायराच्या फोटोंवर नेहमीप्रमाणे लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.
4 / 10
मकर संक्रातीनिमित्तानं मायरानं खास काळ्यारंगाचा पारंपारिक ड्रेस आणि हलव्याचे दागिने परिधान केले आहेत.
5 / 10
एखाद्या कसदार आणि अनुभवी मॉडेलला देखील तोंडात बोटं घालण्यास भाग पाडेल असे जबरदस्त हावभाव मायरानं या फोटोशूटमध्ये दिले आहेत.
6 / 10
मायरा अवघ्या चार वर्षांची आहे आणि टिकटॉप अॅपमुळे ती खूप प्रसिद्ध झाली. टिकटॉक अॅपवर मायराचे प्रचंड फॉलोअर्स होते.
7 / 10
मायराला लोकमत इन्फ्लूअन्सर अवॉर्ड्स सोहळ्यात बेस्ट किड इन्फ्लूअन्सर पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
8 / 10
सोशल मीडियावर मायराच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. तिचे फोटोज, व्हिडीओज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. परीचे डान्स, तिचे भन्नाट डायलॉग, इतकंच काय तिच्या सुंदर कपड्यांचीदेखील चर्चा होते.
9 / 10
युट्युबवर Myra’s corner नावानं मायराचं चॅनल आहे. त्यावर तिचे आतापर्यंत २.५७ लाख फॉलोअर्स आहेत. तिच्या या चॅनलवर तिचे अनेक व्हिडीओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या २.८५ लाख इतकी आहे.
10 / 10
माझी तुझी रेशीमगाठचा प्रोमो आल्यापासून सोशल मीडियावर मायराची चर्चा सुरू झाली. त्या प्रोमोमध्ये मायरा अभिनेता श्रेयस तळपदेसोबत लग्नाची बोलणी करताना दिसली. मालिकेनं अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यात मायराचा मोठा वाटा आहे. क्युट मायरासाठी मालिका पाहणाऱ्या, अपने पास बहुत पैसा म्हणणाऱ्या परीच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे.
टॅग्स :झी मराठीटेलिव्हिजन