1 / 10‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली, चाहत्यांची आवडती गौतमी देशपांडे आता हिची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. (PICS: Gautami Deshpande/Instagram)2 / 10अल्पावधीत ती प्रचंड लोकप्रिय झाली. तिच्या गोजरा चेहरा आणि दमदार अभिनय या जोरावर गौतमीने मोठा चाहतावर्ग मिळवला.3 / 10फावल्या वेळात गौतमीचा बराचसा वेळ सोशल मीडियावर जातो. आता अशात चाहत्यांचे प्रश्न तर असणारच. शेवटी आपल्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल जाणून घ्यायला कुणाला आवडणार नाही?4 / 10अलीकडे गौतमीने इन्स्टा लाईव्हच्या माध्यमातून चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी गौतमीच्या एका उत्तराने सर्वांनाच क्लिनबोल्ड केले.5 / 10होय, तुला कसा नवरा हवा? असा प्रश्न एका चाहत्याने गौतमीला केला.6 / 10यावर, चांगला हवा ना, असे भन्नाट उत्तर गौतमीने दिले. तिच्या या उत्तराची चर्चा झाली नसेल तर नवल.7 / 10 आवडता गायक कोण? असा देखील प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने बॉलिवूड सिंगर सोनू निगमचे नाव घेतले.8 / 10 गौतमी ही प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मणी देशपांडे हिची बहिण आहे. 9 / 10गौतमी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे़ आपल्या फॅन्ससोबत ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.10 / 10गौतमीएक उत्तम गायिका आहे. अनेक वेळा ती गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. गौतमीला गाण्याचा वारसा तिच्या आजीकडून मिळाला आहे.