मुर्हूत ठरला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ, डिटेल्स आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 13:26 IST
1 / 9सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात(Vanita Kharat) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 2 / 9अभिनेत्री वनिता खरात(Vanita Kharat)च्या लग्नाची तारीख समोर आली आहे. 3 / 9वनिता खरातने तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाच्या दिवशी जाहिररित्या प्रेमाची कबुली दिली होती. 4 / 9सुमित लोंढे असे वनिताच्या बॉयफ्रेंडचे नाव आहे. तिने लिहिले होते की, कुछ तूने सी है मैंने की हैं रफू….ये डोरियां …….हॅप्पी बर्थडे साथी. 5 / 9इतकेच नाही तर दिवाळीही या दोघांनी एकत्र साजरा केला.6 / 9आता लवकरच ती सुमितबरोबर लग्न करणार आहे. तसेच तिने तिच्या लग्नाची तयारीही सुरू केली आहे. 7 / 9बॉयफ्रेंडसह फोटो शेअर केल्यानंतर वनिता लग्न कधी करणार? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीनुसार, वनिता फेब्रुवारी २०२३मध्ये लग्न करणार आहे. तिने लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आहे. 8 / 9ग्न कुठे होणार आहे, लग्नाला कोण कोण उपस्थित असणार याबाबत अद्याप काहीही समजलेले नाही.9 / 9वनिता खरातचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील अनेक मंडळी सुमितला ओळखतात. त्यांच्यासह अनेक फोटोही त्याने शेअर केले आहेत.