Join us

"तो रोज मला I Love You असं पाठवायचा आणि...", शिवाली परबला आला चाहत्याचा विचित्र अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:23 IST

1 / 8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. याच शोमधून अभिनेत्री शिवाली परब घराघरात पोहोचली.
2 / 8
हास्यजत्रेतून प्रसिद्धी मिळालेल्या शिवालीने काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. एका सिनेमाच्या निमित्ताने तिने नुकतीच लोकसत्ताला मुलाखत दिली.
3 / 8
या मुलाखतीत शिवालीने एका चाहत्याचा विचित्र अनुभव सांगितला. एक चाहता रोज शिवालीला I Love You असा मेल पाठवायचा.
4 / 8
शिवाली म्हणाली, 'एक मुलगा मला साधारण तीन महिने रोज I Love You असा मेल करायचा'.
5 / 8
'रोज सकाळी ११-११.३० वाजता त्याचा मेल यायचा. हे तीन महिने सुरू होतं. नंतर मी काही लक्ष दिलं नाही. कारण, हे सगळं माझी टीम बघते'.
6 / 8
'त्यामुळे त्यांच्याकडून मला ही गोष्ट कळली. मी काही रिप्लाय दिला नाही'.
7 / 8
'त्यानंतर पुढचा दीड महिना तो मला I Hate You असा मेल करत होता. त्यानंतर मग हे बंद झालं'.
8 / 8
'कदाचित त्याला कळलं असेल की मी भाव देत नाहीये. पण, काही लोक खरंच खूप वेड्यासारखं वागतात'.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकार