By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 17:57 IST
1 / 7सबसे कातिल गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरुन गौतमीचं लग्न झालं की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला. 2 / 7या व्हिडीओमध्ये गौतमीने हिरव्या रंगाची साडी नेसून डोक्याला मुंडावळ्या बांधल्याचं दिसलं होतं. हातात हिरवा चुडाही होता. 3 / 7गौतमीसोबत या व्हिडीओत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता ओंकार राऊतही होता. ओंकारसाठी तिने खास उखाणाही घेतला. 4 / 7'ना वायफाय ना इंटरनेट...गच्चीवर झाली आमची पहिली भेट, ओंकार रावांचं नाव घेते आमची जोडी एकदम परफेक्ट', असा उखाणा गौतमीने घेतला. 5 / 7पण ओंकार आणि गौतमीने खरंच लग्न केलं नसून गच्ची या अल्बम साँगमधील हा व्हिडीओ आहे. 6 / 7गौतमीसोबत काम केल्यानंतर ओंकारने त्याच्या अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली आहे. 7 / 7'गच्ची...सगळ्यांनी नक्की पाहा...गौतमी तुझ्याबरोबर काम करून खरंच खूप मज्जा आली', असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.