PHOTOS : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अरूण कदम यांच्या लेकीला पाहिलंत का? दिसते फारच सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 10:04 IST
1 / 10‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या धम्माल विनोदी कार्यक्रमाचं नाव घेतलं तरी काही चेहरे डोळ्यांपुढे येतात. यातलाच एक चेहरा म्हणजे, अभिनेते अरूण कदम. 2 / 10अरूण कदम यांचे आगरी भाषेतील विनोद प्रेक्षकांना खळखळून हसवतात. पण आज याच अरूण कदम यांच्याबद्दल नाही तर त्यांच्या गुणी लेकीबद्दल सांगणार आहोत.3 / 10अरूण कदम यांच्या पत्नीचं नाव वैशाली कदम आहे. या दाम्पत्याला सुकन्या नावाची एक मुलगी आहे. सुकन्याचा काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं.4 / 10सुकन्या ही कमालीची सुंदर आहे. सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह आहे. वडिलांसोबतचे तिचे भन्नाट रील्स ती शेअर करत असते.5 / 10मुळात सुकना ग्राफिक्स डिझाईनर आहे. कमर्शिअल आर्टिस्ट आहे. शिवाय भरतनाट्यम डान्सर आहे. मॉडेल अशीही तिची ओळख आहे.6 / 10सुकन्याने काही महिन्यांआधी सागर पोवळेसोबत लग्नगाठ बांधली. अरूण कदम यांचा जावई बिअर क्षेत्रात हेड ब्रिवर म्हणून कार्यरत आहे. 7 / 10सुकन्या व तिच्या वडिलांचं बॉन्डिंग फारच भारी आहे. दोघंही मजेशीर रिल्स बनवून चाहत्यांना सतत हसवत असतात.8 / 10अरूण कदम, त्यांची पत्नी वैशाली आणि लेक सुकन्या या त्रिकोणी कुटुंबाची धम्माल पाहत नेटकरी बराच काळ त्यांच्या सोशल अकाऊंटवर घालवतात.9 / 10गेल्या दोन दशकांपासून वेगवेगळ्या विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणा-या अरूण कदम यांना ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या शोने नवी ओळख दिली. यानंतर अनेक कॉमेडी शोमध्ये ते दिसले. 10 / 10आगरी भाषेवर विशेष प्रभुत्व असलेल्या अरूण कदमांच्या तोंडून आगरी भाषा ऐकायला जाम भारी वाटते. केवळ कॉमेडी शो नाही तर अनेक मराठी सिनेमा आणि मराठी मालिकांमध्ये सुद्धा कामे केली आहेत.