Join us  

Leonardo DiCaprio Viral Photo : 'टायटॅनिक'चा हिरो भारतीय तरुणीच्या प्रेमात; जाणून कोण आहे नीलम गिल..?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2023 5:29 PM

1 / 7
'टायटॅनिक' चित्रपटाचा हिरो, म्हणजेच हॉलिवूड सुपरस्टार लिओनार्डो डिकॅप्रियो चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी अनेकदा चर्चेत असतो. लिओनार्डो नेहमी त्याच्यापेक्षा वयाने खूप लहान तरुणींना डेट करतो. काही दिवसांपूर्वीच त्याच्या ब्रेकअपची बातमी आली होती. पण, आता त्याच्या नवीन प्रेम प्रकरणाची बातमी समोर आली आहे. लिओनार्डो आता एका भारतीय वंशाच्या तरुणीच्या प्रेमात पडला आहे. विशेष म्हणजे, ही भारतीय वंशाची मॉडेल त्याच्यापेक्षा 20 वर्षे लहान आहे.
2 / 7
लिओनार्डोच्या प्रेमप्रकरणांची यादी खूपच मोठी आहे. आता पुन्हा एकदा लिओनार्डो रिलेशनशीपमध्ये आला आहे. लिओनार्डो मंगळवारी लंडनमध्ये भारतीय वंशाची ब्रिटिश मॉडेल नीलम गिल(Neelam Gill) सोबत डिनर करताना दिसला. त्यांचे फोटो समोर आल्यानंतर अभिनेत्याचे लव्ह लाईफ पुन्हा एकदा इंटरनेटवर चर्चेचा विषय बनली आहे.
3 / 7
नीलम गिल अलीकडेच कान्स फिल्म फेस्टिवलमध्येही दिसली होती. तिथे लिओनार्डो डिकाप्रियओ आपला आगामी चित्रपट किलर्स ऑफ द फ्लावर मूनच्या स्क्रीनिंगसाठी आला होता.
4 / 7
नीलम गिल एक भारतीय वंशाची ब्रिटीश मॉडेल आहे. तिचा जन्म 27 एप्रिल 1995 रोजी कॉव्हेंट्री, वॉर्विकशायर, इंग्लंड, युनायटेड किंगडम येथे झाला. ती व्यवसायाने मॉडेल असून 28 वर्षांची आहे. तिचे आजोबा पंजाबचे रहिवासी होते.
5 / 7
नीलम तिच्या मॉडेलिंग करिअरमध्ये खूप यशस्वी आहे. तिने बर्बेरी, अॅबरक्रॉम्बी आणि फिचसह अनेक मोठ्या ब्रँड्ससोबत काम केले आहे.
6 / 7
नीलम गिल इंस्टाग्राम बायोमध्ये स्वतःला एक ब्रिटिश पंजाबी मॉडेल म्हणवते. सोशल मीडियावर नीलमची तगडी फॅन फॉलोइंग आहे. फोटोंमध्ये नीलम अतिशय बोल्ड आणि बिंदास्त दिसते. नीलमचे स्वतःचे YouTube चॅनेलदेखील आहे. यात ती बुलिंग, डिप्रेशन आणि बॉडी कॉन्फिडेंससारख्या मुद्द्यांवर भाष्य करते.
7 / 7
दरम्यान, नीलम गिलपूर्वी लिओनार्डो अनेक तरुणींसोबत रिलेशनशीपमध्ये होता. लिओनार्डोने कॅमिला मोरोनला डेट केले आहे. त्यानंतर सुपरमॉडल गिगी हदीदसोबतची डेटिंगची चर्चा होती. आता त्याचे नाव नीलम गिलसोबत जोडले जात आहे. सत्य काय आहे, हे येणाऱ्या काळात समजेल.
टॅग्स :लिओनार्डो डिकैप्रियोहॉलिवूडबॉलिवूड