By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:19 IST
1 / 7ऋजुता देशमुख ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'कळत नकळत' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या ऋजुताने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 2 / 7सध्या ऋजुता 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती महत्त्वाची भूमिका साकारत आहे. 3 / 7ऋजुताच्या पावलावर पाऊल ठेवतच तिची लेकही मनोरंजन विश्वात पदार्पण करत आहे. मराठी सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 4 / 7ऋजुताच्या लेकीचं नाव साजिरी असं आहे. दिसायलाही साजिरी हुबेहुब तिच्या आईसारखीच आहे. 5 / 7साजिरीचा चेहराही ऋजुता सारखाच गोल आहे. आणि तिचे केसही कुरळे आहेत. साजिरीचे फोटो पाहून हे लक्षात येतं. 6 / 7साजिरी सध्या सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसली तरी तिने तिचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. 7 / 7याआधीही साजिरीने काही छोटी मोठी कामं केली आहेत. बालपणापासून घरातूनच अभिनयाचे धडे मिळालेली साजिरी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.