IN PICS : ‘कॉमेडी क्वीन’ ते ‘कबीर सिंग’ची मोलकरीण..., जाणून घ्या वनिता खरातबद्दल बरंच काही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 17:06 IST
1 / 9‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून घराघरात पोहोचलेली वनिता खरात छोट्या पडद्यावरची एक लोकप्रिय अभिनेत्री. आज वनिताचा वाढदिवस.2 / 9कबीर सिंग या शाहिद कपूरच्या सिनेमात तुम्ही तिला बघितलं असेलच. मोलकरणीच्या हातामधून ग्लास खाली पडून फुटतो आणि सनकी शाहिद तिच्यामागे रागाने धावत सुटतो,असा एक सीन या सिनेमात होता. या सीनमधील ती मोलकरीण कोण होती? तर ती वनिता खरात होती.3 / 9होय, कबीर सिंग या सिनेमात तिने शाहिदच्या मोलकरणीची भूमिका साकारली होती. आधी या सीनमधील ती मोलकरीण अर्पिता खान (सलमान खानची बहिण) आहे, असा अनेकांचा समज झाला होता. पण ती अर्पिता नसून वनिता खरात होती.4 / 9या सीनवर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले होते. वनिताने हे मीम्स प्रचंड एन्जॉय केलेत. वनिताला ‘कबीर सिंग’ मधील ही भूमिका कशी मिळाली, हेही इंटरेस्टिंग आहे.5 / 9 वनिताची एक मैत्रिण मुकेश छाब्रांच्या ऑफिसात काम करत होती. मुकेश छाब्रांना यासाठी एक नवा चेहरा होता. मैत्रिणीने वनिताची नाव सुचवले आणि तिला ऑडिशनसाठी बोलवले गेले. ऑडिशनमध्ये वनिता पास झाली आणि तिला ही भूमिका मिळाली.6 / 9वनिताने थिएटरमध्ये काम केलेय. पहिल्यांदा वनिता सेटवर गेली तेव्हा वनिता प्रचंड दडपणात होती. पण सेटवरचे वातावरण, शाहिद कपूरचा स्वभाव बघून तिचे हे दडपण कुठल्या कुठे पळाले. 7 / 9मुंबईतील किर्ती कॉलेजमध्ये शिकत असताना एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेत वनिताने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. याच दरम्यान तिला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात झळकण्याची संधी मिळाली. 8 / 9अलीकडे वनिता न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. बॉडी शेमिंग करणा-यांना तिने या फोटोशूटद्वारे सणसणीत उत्तरं दिलं होतं.9 / 9वनिता खरातचे इंस्टाग्रामवर 43 हजारांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.