Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडमध्ये सेट होतोय लग्नाचा नवा ट्रेंड, कियारापासून ते आलियापर्यंत सगळ्यांनीच केलाय तो फॉलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 15:49 IST

1 / 7
नुकताच शेहशाह कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचंही लग्न संध्याकाळच्या मुहूर्तावर पार पडले. त्यामुळे पुन्हा एकदा कलाकार संध्याकाळी का लग्न करतात हा प्रश्न चर्चेत आला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 7
अलीकडेच पती-पत्नी बनलेल्या अथिया शेट्टी-केएल राहुलच्या या फोटोतही तुम्ही मावळता सूर्य पाहू शकता. दोघांमध्ये येणार हा सूर्य प्रकाशाने या फोटोला चार चाँद लावले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 7
आलिया भट्ट-रणबीर कपूर यांनी 14 एप्रिल 2022 रोजी संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान लग्न केलं. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 7
दीपिका पादुकोण-रणवीर सिंग यांच्या लग्नाचे विधी दुपारी २ नंतर सुरू झाल्या. चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान दोघांचा विवाह पार पडला. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 7
कतरिना कैफ-विकी कौशल यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ३.३० ते ३.४५ दरम्यान सात फेरे घेतले. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 7
दिया मिर्झाने 15 फेब्रुवारी 2022 रोजी बिझनेसमन वैभव रेखीसोबत लग्न केले. या दोघांचा विवाह ही ५ ते ६ वाजेच्या दरम्यान पार पडले.(फोटो इन्स्टाग्राम)
7 / 7
मावळत्या सूर्याच्या प्रकाशात लग्न करण्यामागे ना कोणती परंपरा आहेत ना काही विशेष प्रथा. त्यामागे फक्त कॅमेराचा 'क्लिक' असतो. संध्याकाळ ही अशी वेळ आहे ज्यामध्ये काढलेले फोटो अतिशय सुंदर येतात. मावळत्या सूर्याचा मंद प्रकाशात येणारे फोटो बॉलिवूड कलाकारांना फार आवडतो. त्यामुळे आता बहुतेक कलाकार संध्याकाळी लग्न करतात.
टॅग्स :कियारा अडवाणीसिद्धार्थ मल्होत्राआलिया भटकतरिना कैफदीपिका पादुकोण