Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींनी केलं आपल्यापेक्षा लहान तरुणांसोबत लग्न, कतरिना-विक्कीमध्येही आहे वयाचं अंतर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 14:07 IST

1 / 8
आपल्या समाजात जेव्हा कधी  लग्नाची चर्चा होते तेव्हा आजही मुला-मुलीची जात, रंग, वय पाहूनच पाऊल उचलले जाते. मात्र, अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी समाजाच्या या नियमांना न झुमानता स्वत:चा मार्ग तयार केला आहे. इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्यापेक्षा लहान वयाच्या तरुणाशी लग्न केले. एक नजर टाकूया अशाच जोड्यांवरमीडिया रिपोर्टनुसार लवकरच विकी कौशल आणि कतरिना कैफ विवाह बंधनात अडकणार आहेत. कतरिना कैफ 38 वर्षांची आहे तर विकी 33 वर्षांचा. दोघांच्या वयामध्ये 5 वर्षांचे अंतर आहे.
2 / 8
प्रियंका चोप्रा आणि निक जोनासच्या जोडीला एक पावर कपल म्हणून ओळखलं जातं. प्रियंका चोप्रा निक जोनासपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे.
3 / 8
नेहा धूपिया आणि अंगद बेदीने 2018मध्ये गुपचूप लग्न केलं होते. अंगद नेहाहून 2 वर्षांनी लहान आहे. 
4 / 8
सैफ अली खान आणि अमृता सिंगचा तसा तर घटस्फोट झालेला आहे. या कपलनेसुद्धा लव्ह मॅरेज केलं होतं. अमृता आपला एक्स पती सैफ अली खानपेक्षा 12 वर्षांनी मोठी होती.
5 / 8
पती कुणाल खेमू पेक्षा सोहा अली खान मोठी आहे. कुणालपेक्षा सोहा 4 वर्षांनी मोठी आहे.
6 / 8
साऊथचा सुपरस्टार महेश बाबू आणि नम्रता शिरोडकरचं नाव प्रसिद्ध कपलच्या यादीत सामिल आहे. महेश नम्रताहून 3 वर्षांनी लहान आहे,
7 / 8
बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या रायसुद्धा पती अभिषेक बच्चनपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे.
8 / 8
'द कपिल शर्मा' शोमध्ये जजची भूमिका साकारणाऱ्या अर्चना पूरण सिंगने आपल्या पेक्षा 7 वर्षांनी लहान असलेल्या परमीत सेठीसोबत लव्ह मॅरेज केलं आहे.  
टॅग्स :कतरिना कैफविकी कौशलप्रियंका चोप्रानिक जोनासनेहा धुपियाऐश्वर्या राय बच्चन