Kashish Kapoor : "माझ्याकडे दुर्लक्ष केलं, हा माझा अपमान"; सलमान खानला धडा शिकवणार कशिश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 13:21 IST
1 / 9वीकेंड का वारमध्ये कशिश कपूर आणि अविनाश मिश्रा यांच्यातील फ्लर्टिंगचा मुद्दा गाजला होता. सलमानने अभिनेत्रीवर अविनाशसोबत अँगल क्रिएट केल्याचा आरोप केला होता.2 / 9कशिशनेही सलमानसमोर आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला. पण सलमान काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने कशिशची बाजू ऐकली नाही.3 / 9यामुळे निराश झालेल्या अभिनेत्रीने सलमानवर संतप्त प्रतिक्रिया दिली. कशिशची ही कृती सलमानला आवडली नाही. तो स्पष्टपणे म्हणाला - माझ्यासोबत असं करू नकोस.4 / 9कशिशने तेव्हा सलमानसमोर सॉरी म्हटलं होतं. मात्र नंतर चाहत पांडेशी बोलताना कशिशला राग अनावर झाला.5 / 9अभिनेत्रीने तिचा राग सलमानवर काढला. कशिश म्हणाली - 'मी सॉरी म्हणून गप्प बसणार नाही. कारण मी हे केलं नाही तर मी ते स्वीकारणार देखील नाही.'6 / 9'ही छोटी बाब नव्हती. मी कशाबद्दल बोलत आहे हे तुम्हाला समजत नसेल तर मी काय आहे हे तुम्हाला समजणार नाही.'7 / 9'शेवटी मी म्हणाले, सर, फक्त एक सेकंद, मला समजतंय की तुम्ही माझं ऐकत आहात, परंतु तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करत आहात. ते माझ्यासाठी खूप अपमानास्पद आहे.'8 / 9'मला वाईट वाटलं. मी पण एक स्पर्धक आहे. मी नॅशनल टीव्हीवर आहे. माझी चूक नसेल तर मी थोडं ऐकून घेणार नाही.'9 / 9'माझ्या वडिलांना आणि आईला माहित असले पाहिजे की मी गैरवर्तन केलेलं नाही. या चुकीच्या गोष्टीबद्दल माझ्याकडे बोट दाखवण्यात आलं आहे. आरोप चुकीचा आहे. त्यामुळे मी असाच माझा बचाव करीन.'