थिएटर गाजवलं, आता ओटीटीवर प्रदर्शित होताच घातला 'धमाका', कोणता आहे हा सिनेमा ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 18:50 IST
1 / 9 Top Trending Film On OTT : एका चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा आहे. एक लोकप्रिय अभिनेता आणि तीन सुंदरी असलेल्या या सिनेमाने थिएटर तर गाजवलेच आहे. पण, आता ओटीटीवरही धमाका केलाय. 2 / 9 150 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे.3 / 9हा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे 'भुल भुलैया 3'. आतापर्यंत या सिनेमानं तब्बल 417 कोटी कमावले आहेत. 4 / 9सध्या हा सिनेमा नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग लिस्टमध्येही या चित्रपटाने स्थान मिळवले असून या चित्रपटाचा चाहते आनंद घेत आहेत. 5 / 9हा चित्रपट 1 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. यावेळी रुह बाबा सोबत माधुरी दीक्षित आणि विद्या बालन देखील आहेत 6 / 9माधुरी दीक्षित आणि विद्या बालन यांचा दमदार अभिनय या सिनेमात पाहायला मिळतोय. 7 / 9तसेच तृप्ती डिमरी, विजय राय, राजपाल यादव आणि संजय मिश्रा देखील चित्रपटाचा भाग आहेत. 8 / 9चित्रपटात अशी अनेक दृश्ये आहेत, जी खरोखरच भितीदायक आहेत आणि त्याचवेळी त्यात कॉमेडीचा जबरदस्त टच आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा कुटुंबासोबत पाहण्यासारखा आहे. 9 / 9'भूल भुलैया 3' चे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.