करिश्मा कपूरचा पहिला हिरो आज आहे अज्ञातवासात, वाढत्या वजनाने बरबाद केले करिअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 13:21 IST
1 / 1230 वर्षांपूर्वी आलेल्या 'प्रेम कैदी' करिश्मा कपूरच्या डेब्यू सिनेमाचा नायक हरीश कुमार होता. सोशल मीडियावर हरीशचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 2 / 12हरीश सध्या लाइमलाइटमध्ये नसून त्याचे आयुष्य एन्जॉय करतोय. तो बराच काळापासून सिनेसृष्टीपासून दूरच आहे. 3 / 12हरीशने आपल्या करिअरमध्ये हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड आणि इतर भाषांमधील सिनेमांमध्येही काम केले आहे. बॉलिवूडमध्ये नावाजलेल्या कलाकारांसह काम करत आपले अस्तित्व निर्माण केले होते. 4 / 12गोविंदा, रेखा, श्रीदेवी, मिथुन चक्रवर्ती, पूजा भट्ट, अनिल कपूर यासारख्या लोकप्रिय कलाकारांसह झळकूनही त्याला फारसे यश मिळू शकले नाही.5 / 12हरीश कुमार त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमामिळून 300 हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. 6 / 12हरीश कुमारने नाना पाटेकर सोबत ‘तिरंगा’ सिनेमात भूमिका केली होती. याशिवाय त्याने गोविंदासह 'कुली नं 1' सारख्या सिनेमात काम केले आहे 'कुली नं 1' सिनेमात हरीशने गोविंदाच्या मित्राची भूमिका साकरली होती.7 / 12 ९० च्या दशकात हरीश कुमारचे करिअर सुरुळीत सुर असतानाच तो सिनेमांपासून दूर गेला. रिपोर्ट्सनुसार हरीश आपले वजन नियंत्रित करू शकला नाही.वाढत्या वजनामुळे त्याचा लूक पूर्णपणे बदलला होता.8 / 12लठ्ठपणामुळे त्याला काम मिळणेही बंद झाले होते. बॉलिवूडनंतर हळूहळू इतर भाषेत बनणा-या सिनेमांपासूनही दूर झाली.9 / 122001 मधील ‘इंतकाम’ या सिनेमानंतर तो लाइमलाइटपासून दूर गेला. २०१० मध्ये तो 'नॉटी एट ४०' या सिनेमाद्वारे पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. 10 / 12या सिनेमात गोविंदासुद्धा होता. २०१२ मध्ये ती ‘चार दिन की चांदनी’ सिनेमात झळकला. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप ठरला होता.11 / 12हरीशने 'आदमी', 'क्रांति क्षेत्र', 'द जेंटलमैन', 'फूलन देवी', 'रावण राज', 'जवाब', 'गद्दार', 'भीष्मा', 'आर्मी', 'फूल और आग', 'बुलंदी', 'इंतकाम' सिनेमात काम करत रसिकांची पसंती मिळवली होती.12 / 121995 मध्ये हरीशने संगीता चुग यांच्याशी लग्न केले. या दोघांना दोन मुलं आहेत. हरीश कुमार आपल्या कुटूंबासह मुंबईत राहतो.