Join us

IN PICS : ‘के’च्या प्रेमात पडला होता करण जोहर, ‘मुन्नाभाई’मुळे सुटला मोह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 16:33 IST

1 / 8
निर्माता- दिग्दर्शक करण जोहरचा वेगळा असा एक चाहता वर्ग आहे. कौटुंबिक मुल्य जपतानाच त्यातून प्रेमकहाणी फुलवत कथानकाला वेगळ वळण देण्यात करण जोहरला तोड नाही. त्याचे असे अनेक चित्रपट गाजलेत.
2 / 8
करणच्या सुरूवातीच्या सिनेमांवर एक नजर टाकली तर एक गोष्ट ठळकपणे लक्षात येईल ती म्हणजे, त्याचे ‘के’ प्रेम.
3 / 8
होय, सुरूवातीचे त्याच्या अनेक सिनेमांची ‘के’ या आद्याक्षरावरून सुरू होताना दिसतात. शाहरूख, राणी मुखर्जी आणि काजोलचा गाजलेला सिनेमा ‘कुछ कुछ होता है’चे टायटलही ‘के’वरून सुरु होते.
4 / 8
‘के’ या आद्याक्षरावरून सुरू होणारा त्याचा ‘कभी खुशी कभी गम’ हा सिनेमाही असाच गाजला होता. कभी अलविदा ना कहना हाही असाच एक ‘के’ वरून सुरू होणारा सिनेमा होता.
5 / 8
करिअरच्या सुरूवातीच्या काळात करण जोहरची ज्योतिषावर प्रगाढ श्रद्धा होती. ‘के’ हे अक्षर तुझ्यासाठी लकी आहे, असे कुणीतरी त्याला सांगितले होते. त्यामुळे त्याने त्याच्या अनेक सिनेमांचे टायटल ‘के’वरून ठेवले होते.
6 / 8
विशेष म्हणजे हे सर्व सिनेमे हिटही झाले होते़. साहजिकच ‘के’ हे अक्षर आपल्यासाठी लकी आहे, यावरचा करणचा विश्वास आणखी दृढ झाला होता. पण एक वेळ अशी आली की, त्याचे डोळे खाडकन् उघडले.
7 / 8
संजय दत्त स्टारर ‘लगे रहो मुन्नाभाई’चा एक सीन पाहून करण जोहरला ज्योतिष्य, नशीब असे काहीही नसते, हे कळले. या सीनमध्ये ज्योतिष वगैरे काहीही नसते, हे समजावले गेले होते. हा सीन पाहून करणचा अंधविश्वास जरा कमी झाला.
8 / 8
यानंतर त्याने ‘के’वरचे सिनेमे बनवले नाहीत, असे नाही. पण यानंतर दुस-या आद्याक्षरावरूनही त्याने सिनेमाचे टायटल निवडले. करणच्या धर्मा प्रॉडक्शनचे येत्या काळात अनेक सिनेमे येणार आहेत. ब्रह्मास्त्र, सूर्यवंशी, LIGER अशा काही सिनेमांचा यात समावेश आहे.
टॅग्स :करण जोहर