Join us

आणखी एका स्टारकिडला लाँच करतोय करण जोहर, आई-वडिलांनी गाजवलंय बॉलिवूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 14:57 IST

1 / 10
Karan Johar Announces Debut Star Kid: बॉलिवूडमधलं सर्वाधिक चर्चेत असणारं नाव म्हणजे करण जोहर (Karan Johar). दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता अशा तिन्ही क्षेत्रात त्याने आजवर काम केलं. करणने आतापर्यंत बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
2 / 10
करणने अनेक स्टारकिड्सला लाँच केलं आहे. चित्रपटांमध्ये केवळ स्टार किड्सलाच संधी देतो, अशी करणवर टीकाही झाली आहे.
3 / 10
पण या टीकेला न जुमानता आलिया भट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यानंतर करण आता आणखी एका स्टारकिडला लाँन्च करणार आहे.
4 / 10
आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत एक स्टारकिड बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा अभिनेता आहे इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan).
5 / 10
सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग (Amrita Singh) यांचा इब्राहिम अली खान हा मोठा मुलगा आहे.
6 / 10
इब्राहिम अली खानची बहिण सारा अली खान (Sara Ali Khan) आधीपासूनच बॉलिवूडमध्ये काम करतेय. तिनेही काही हीट सिनेमे दिले आहेत.
7 / 10
करण जोहरने इब्राहिम त्याच्या सिनेमातून पदार्पण करत असल्याची घोषणा केली आहे. करणने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन याबाबतची माहिती शेअर केली. त्यानं लिहलं, 'मी अमृता म्हणजेच डिंगीला... तिच्या जवळचे व्यक्ती तिला डिंगी म्हणतात, पहिल्यांदा भेटलो तेव्हा फक्त १२ वर्षांचा होतो. तेव्हा ती माझ्या वडिलांसोबत धर्मा प्रॉडक्शनसाठी 'दुनिया' नावाचा चित्रपट करत होती. तीची कॅमेऱ्यासमोरची ऊर्जा मला आजही स्पष्टपणे आठवते'.
8 / 10
पुढे त्यानं लिहलं, 'पण तिच्यासोबतची खास आठवण म्हणजे आमच्या पहिल्या भेटीनंतर ती आणि तिच्या हेअरस्टायलिस्टसोबत केलेला चायनीज डिनर आणि त्यानंतर पाहिलेला जेम्स बाँड चित्रपट. यानंतर जेव्हा आम्ही दुसऱ्यांदा भेटलो, तेव्हा तिनं मला जवळच्या व्यक्तीसारखं वागवलं. तिच्यातील तोच दयाळूपणा आज तिच्या मुलांमध्येही जीवंत आहे'.
9 / 10
पुढे सैफसोबतच्या पहिल्या भेटीबद्दल करण लिहतो, 'सैफला मी आनंद महैंद्रू यांच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा भेटलो होतो. तरुण, राजबिंडा आणि मोहक... अगदी तसाच जसा मी पहिल्यांदा इब्राहिमला भेटलेलो. नशीबाने आमच्यातील मजबूत मैत्री आता आमच्या मुलांमध्येही आहे. मी या कुटुंबाला ४० वर्षांपासून ओळखतोय. त्यांच्यासोबत वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम केलं आहे. अमृतासोबत 'दुनिया' आणि '२ स्टेट्स'. तर सैफसोबत 'कल हो ना हो', 'कुर्बान'. अर्थातच सारासोबत 'सिंबा' आणि पुढे खूप सारे प्रोजेक्टसुद्धा येणार आहेत'
10 / 10
करणनं लिहलं, 'मी या कुटुंबाला त्यांच्या हृदयामुळे ओळखतो. अभिनय त्यांच्या रक्तात आहेत, त्यांच्या अनुवांशिकतेत आणि त्यांच्या आवडीमध्येही. आता एक नवीन प्रतिभा जगाला दाखवण्यासाठी मी उत्सुक आहे. तर तयार व्हा... आता इब्राहिम अली खान तुमची मनं जिंकायला येतोय'. पण, करण जोहरने तो नेमका कोणत्या सिनेमातून इब्राहिमला लाँच करतोय, याचा खुलासा केला नाहीये.
टॅग्स :करण जोहरसैफ अली खान अमृता सिंगइब्राहिम अली खान